चिक्कोडी येथे सिलिंडरच्या स्फोटात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

चिक्कोडी - येथील होसपेठ गल्लीत घरात सिलिंडरच्या स्फोटात युवक ठार झाला आहे. अभिजित श्रीकांत कब्बूरकर (19) असे मृताचे नाव आहे. 

चिक्कोडी - येथील होसपेठ गल्लीत घरात सिलिंडरच्या स्फोटात युवक ठार झाला आहे. अभिजित श्रीकांत कब्बूरकर (19) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गॅस गिझरसाठी लावण्यात आलेल्या सिलिंडरमधून गळती झाली. अभिजितने सकाळी अकरा वाजता गॅस पेटवला तेव्हा गळतीमुळे स्फोट झाला. या स्फोटातच अभिजितचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिस निरिक्षक बसवराज मुकुर्तीहाळ यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in cylinder explosion at Chikkodi