परप्रांतीयांकडून केडगावात एकाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नगर - केडगाव परिसरातील शास्त्रीनगर भागात काल रात्री किरकोळ कारणावरून परप्रांतीय कामगारांनी एकाचा खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मनोज भाऊसाहेब अंधारे (वय 35, रा. ग्रीन सिटी, शास्त्रीनगर केडगाव) असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे. 

केडगावमधील शास्त्रीनगर भागामध्ये रेल्वेरूळाजवळ ग्रीन सिटी नावाने नवीन बांधकाम सुरू आहे. त्याला चोहीबाजूंनी कंपाउंड आहे. काल रात्री तेथे काम करणारे परप्रांतीय तरुण आणि वॉचमन यांच्या किरकोळ करणावरून वादावादी झाली. त्याच वादावादीतून परप्रांतीय कामगारांनी वाचमन मनोज अंधारे याचा खून केल्याचे घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोन परप्रांतीय लोकांना ताब्यात घेतले असून, पोलिस ठाण्यात अकस्मात गुन्हा नोंदविला आहे. गुन्ह्याच्या तपासांनतर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असे पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: One killed in Kedgaon