खासगी वाहनातील प्रवास बेतला युवकाच्या जीवावर 

karhad
karhad

कऱ्हाड - पेठवडगाव येथील युवकाचा गळा चिरून खून झाल्याची घटना ही केवळ पैशासाठी झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तो ज्या टेंपोत बसला त्या टेंपो चालकाने पैशासाठी त्याचा खुन करुन त्याचा मृतदेह मालखेड येथे टाकला. कमी पैशात प्रवास होईल या हव्यासाने एका युवकाला जीवास मुकावे लागले. यातुन धडा घेवुन प्रवाशांनी खासगी ट्रक, टेंपोतुन कमी पैशात दुरवरचा प्रवास होईल या मोहास बळी न पडता सुरक्षीत प्रवास करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा वाईट प्रसंगाना सामोरे जाणे टाळता येईल. 

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव (जि. कोल्हापुर) येथील स्वप्नील सुतार या अवघ्या २२ वर्षीय युवकाचा मालखेड येथे मृतदेह आढळला. स्वप्नील हा चांगल्या स्वभावाचा असल्याने त्याचा खुन नेमका कशामुळे झाला, कोणी केला याचा तपास लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हाण होते. मात्र पोलिसांनी त्याचा सीसीटीव्ही फुटेजव्दारे तपास करुन खुनाचा छडा लावला. त्यामध्ये टेपोचालकानेच पैशांसाठीचा स्वप्नीलचा खुन केला असा संशय व्यक्त करुन कर्नाटकमधील टेंपोचालकास पोलिसांनी अटक केली. चौकशीमध्ये टेंपोचालकाने पैशांसाठीच संबंधित युवकाचा खुन केल्याचे सांगितले असल्याचे पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले. त्यातुन खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी धडा घेण्याची गरज आहे. कमी पैशात प्रवास होते म्हणुन असंख्य प्रवाशी खासगी वाहनातुन प्रवास करतात. त्यामुळे त्यांना अपघात, वाईट प्रसंग आणि आतातर जीवास मुकावे लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खासगी वाहनातुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आतातरी सावध होण्याची गरज आहे. कमी पैशात प्रवास होईल या हव्यासातुन समोर आलेल्या प्रकाराचा बोध घेवुन आतातरी कमी पैशात दुरवरचा प्रवास होईल या मोहास बळी न पडता सुरक्षीत प्रवास करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा वाईट प्रसंगाना सामोरे जाणे टाळता येईल. 

खासगी वाहनातुन प्रवासी वाहतुक करणे कायद्याने नियमबाह्यच आहे. प्रवाशांनीही कमी पैशात प्रवास होतो म्हणुन अशा खासगी वाहतुन प्रवास केल्यावर काय प्रकार होतात हे स्वप्नील सुतार या युवकाच्या खुनाच्या घटनेतुन समोर आले आहे. त्यामुळे खासगी वाहनातुन प्रवास न करता सुरक्षीत प्रवासासाठी एसटीनेच प्रवास करावा. 
नवनाथ ढवळे, पोलिस उपाधिक्षक, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com