'सर्व शिक्षा अभियानांतर्गत' विद्यार्थ्यांसाठी दिड लाख पुस्तके

राजकुमार शहा 
गुरुवार, 31 मे 2018

मोहोळ - येत्या पंधरा जुन रोजी सुरू होणाऱ्या मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना 'सर्व शिक्षा अभियानांतर्गत' एक लाख त्रेपन्न हजार मराठी माध्यमाची पाठयपुस्तके उपलब्ध झाली असून, या पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. इयत्ता पहिलीची पुस्तके अद्यापही उपलब्ध झाली नसल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी दिली. 

अधिक माहिती देताना फडके म्हणाले, मोहोळ तालुक्यात एकुण पंधरा केंद्र आहेत. बालभारती, गणीत, इंग्रजी, हिन्दी, आदीसह अन्य विषयाची पुस्तके उपलब्ध झाली आहेत. मात्र सेमी माध्यमाची पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. वितरीत केलेली पुस्तके शाळेच्या पहील्याच दिवशी विध्यार्थ्याना देण्यात येणार आहेत. इयता दुसरी ते आठवी पर्यंतची मराठी माध्यमाची सर्व पुस्तके उपलब्ध झाली आहेत. तर दूसरी ते आठवी पर्यंतची सेमी माध्यमाची पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. 

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन उपक्रम म्हणुन लहान शाळांना वीस व मोठ्या शाळiना पंन्नास वृक्षारोपण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. इयता पहिली हे आयुष्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा पाया असतो तो मजबुत व्हावा तसेच इयता पाचवी हे शैक्षणीक जीवनाला कलाटणी देणारे वर्ष असते यासाठी या दोन वर्गावर तालुक्यातील अनुभवी व नामांकीत शिक्षकांची खास नेमणुक करण्यात आली आहे. तसेच मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच का घालावे यासाठी पाहिल्याच दिवशी तालुक्यातील प्रत्येक शाळेत माता पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका आयोजीत करून प्रबोधन करण्यात येणार आहे. यावेळी विस्तार अधिकारी हरिष राऊत विषय तज्ञ महेश लोंढे यांच्यासह अन्य विषय तज्ञ उपस्थीत होते.

Web Title: One lakh books for the students under 'Sarva Shiksha Abhiyan'