सोलापुरात दरवर्षी एक लाख वाहनांची भर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सोलापूर - शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, त्याप्रमाणात लोकसंख्याही वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात दरवर्षी सुमारे एक लाख वाहनांची भर पडत असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले. सद्यःस्थितीत सोलापूर शहराची लोकसंख्या 10 लाख 21 हजार असून, दुसरीकडे वाहनांची संख्या सात लाख 41 हजार अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

शहरांतर्गत बहुतांशी रस्ते खराब झाले असून, वाहनांची संख्या वाढल्याने अपघात वाढत आहेत. पार्किंगची सोय नसल्याने वाहने कुठेही थांबविली जातात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघाताला वाव मिळत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नव्याने वाहतूक आराखडा तयार करण्याचे नियोजन संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.

Web Title: one lakh vehicle increase in solapur