शेतकरी कर्जमाफीसाठी 'या' पोलिसाने दिला एक महिन्याचा पगार (video)

अक्षय गुंड
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन शेतकर्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापुर) : पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन शेतकर्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचार्यांने शेतकर्यांना कर्जमाफी व्हावी, यासाठी आपला एक महिनाचा पगार देवु केला असुन याबाबतचे पत्र व 44 हजार 100 रुपयाचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. माढा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश तुकाराम मांदे असे या शेतकर्याप्रती संवदेनशील पोलिसांचे नाव आहे. 

Image may contain: text

हेही वाचा : अभिमानास्पद : सुंदर पिचाई यांच्याकडे आता गुगल 'अल्फाबेट'चीही जबाबदारी
शेतकरी कर्जबाजारी

सततचा दुष्काळ त्यात पावसाळ्यात अतिवृष्टी नंतर अवकाळी पावसाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी पुर्ण हताश झालेला असुन कर्जबाजारी झाला आहे. या शेतकर्यांला आता सरकाराच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफी करावी अशी आर्त हाक शेतकरी सरकारला करत आहेत. 

हेही वाचा : सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या यन्नम; उपमहापौरपदी राजेश काळे
ठाकरे सकारात्मक

नुतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सकारात्मक आहेत. व तो विषय ते सक्षमपणे हातळला जात असल्याचे बातम्यातुन समजते. परंतु सरकारला कर्जामाफी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समजते. त्यामुळे या आर्थिक अडणचणीतुन मार्ग काढण्याकरीता शासनाने राज्यात काम करणारे केंद्रातील असो अथवा राज्यातील सर्वच कर्मचार्यांच्या १५ दिवसांचा पगार व लोकप्रतिनिधींचे मानधन यासाठी घ्यावे. व शेतकरी कर्ज माफी करावी. त्यासाठी मी माझा एक महिन्याची पगार देत असुन तो आपण स्विकार करावा. अशी विनंती श्री मांदे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. शेतकर्यांसाठी त्यांनी शासनाकडे मदतीचा हात पुढे केल्याने खाकी वर्दितील माणुसकीचे दर्शन दिसुन येत आहे.

No photo description available.

                 
हेही वाचा : सहलीसाठी एसटी बस मिळेल हो...
एक महिन्याचा धनादेश

सध्या शेतकरी संकटात आहे. त्याची मनाला तळमळ वाटते. सामजिक भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माझा एक महिन्याचा पगार धनादेश स्वरूपात सुपूर्द करत आहे.
- रमेश मांदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One month's salary paid by the police for farmers' loan waiver