मंगळवेढा - कोयत्याने गळा चिरून एखाचा खून

हुकूम मुलाणी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मंगळवेढा -  तालुक्यातील जुनोनी शिवारातील भिमराव हाताळगे (वय 42 रा.खुपसंगी) या इसमाचा कोयत्याने गळा चिरून खून झाला असून, सदरचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. तपास वेगाने फिरवल्याने अवघ्या चार तासात तीन  आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आल्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले 

मंगळवेढा -  तालुक्यातील जुनोनी शिवारातील भिमराव हाताळगे (वय 42 रा.खुपसंगी) या इसमाचा कोयत्याने गळा चिरून खून झाला असून, सदरचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. तपास वेगाने फिरवल्याने अवघ्या चार तासात तीन  आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आल्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले 

याबाबतची फिर्याद कुंडलिक मासाळ रा जुनोनी यांनी दिली होती. उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी स.पो.नि. महेश विधाते, सपोनि वैभव मारकड पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय पुजारी यांची पथके नेमली. बोअरपासून काही अंतरावर रक्त पडलेले आढळले व त्या रक्ताच्या काही अंतरावर चुन्याची डबी व चप्पला पडलेल्या आढळल्या. पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने तो बोअरमधील पाईप काढून आतील ते मुंडके बाहेर काढले.

त्या ठिकाणी आढळलेल्या काही वस्तू दाखविल्या मृत व्यक्तीच्या हातावर वंदना व भिमराव असे गोंदनाने मृताची ओळख पटली. मृत गोविंदवाडी ता.गेवराई जि.बीड येथील असून सध्या सासरवाडीत खुपसंगीत वास्तव्यास होता.

पोलीस तपासात अतुल जगन्नाथ सावंत रा.डोंगरगाव,विष्णू बाबू आलदर रा खुपसंगी, दत्तात्रय म्हांळू वळकुंडे रा.घेरडी वाकी ता.सांगोला यां तिघांची नावे स्पष्ट झाल्याने यांना ताब्यात घेतले असून मयताच्या पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि महेश विधाते करीत आहेत. सदरच्या कारवाईत  उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, दत्तात्रय तोंडले, विकास क्षिरसागर, धनंजय आवताडे, दत्तात्रय येलपले, हरीदास सलगर, सोमनाथ माने, दिपक घोंगडे, अनिल दाते, आलमगीर लतीफ, सुहास देशमुख, अमर सुरवसे, सिध्दनाथ मोरे, गणेश सोलनकर, अजित मिसाळ सहभागी झाले. दरम्यान सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर दु.दीडच्या दरम्यान अंतीस संस्कार करण्यात आले.

Web Title: one murdered in magalwedha