विजेसाठी प्रतियुनिट एक रुपये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

इचलकरंजी - उपोषणकर्ते बाळ महाराज यांनी केलेल्या यंत्रमागधारकास प्रतियुनिट 1 रुपये वीज दरात सवलत आणि 5 टक्के व्याज अनुदान देणे, या दोन्ही मागण्या शासनाने मान्य केल्या. 15 दिवसांत ते जास्तीत जास्त महिन्यात या मागण्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केल्या जातील, तर खर्चीवाले यंत्रमागधारकांचा प्रश्‍न चार दिवसांत सोडविण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या जातील, असे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले. 

यंत्रमागधारकांच्या विविध मागण्यांबाबत बाळ महाराज यांनी महात्मा गांधी पुतळा चौकात बेमदुत उपोषण सुरू केले होते. आज खोतकर यांनी बाळ महाराज यांची भेट घेऊन मागण्या मान्य करत असल्याचे आश्‍वासन दिले. त्यांनतर खोतकर यांनी बाळ महाराज यांच्यासह हॉटेल मानस येथे पत्रकारांशी संवाद साधला. खोतकर म्हणाले, ""शासनाने बाळ महाराज यांच्या उपोषणाची दखल घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आज आपण उपोषणकर्ते बाळ महाराज यांना भेटण्यासाठी आलो. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 

ते म्हणाले, ""सभागृहात यंत्रमागधारकांच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. आमदार सुरेश हाळवणकर, रूपेश म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर उत्तरही दिले. प्रतियुनिट 1 रुपयाची वीज दरात सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव ऊर्जा विभागाकडून वित्त विभागाकडे गेला आहे. 5 टक्के व्याज अनुदानाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे आहे.'' 

खर्चीवाल्यांच्या मजुरीवाढीचाही प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आला आहे; मात्र त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, अथवा संदर्भ नाहीत. त्यामुळे चार दिवसांत खर्चीवाले यंत्रमागधारकांचा प्रश्‍न सोडविण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना देणार आहे, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: one rupee per unit of electricity