कडेगाव तालुक्यातील वांगीत कोल्ह्याच्या हल्ल्यात एक गंभीर

कडेगाव तालुक्यातील वांगीत कोल्ह्याच्या हल्ल्यात एक गंभीर

वांगी (ता.कडेगांव) - येथील सावंतमळ्यात वास्तव्यास असणारे संतोष महादेव सुर्यवंशी (वय -२९ वर्षे) यांच्यावर काल एका कोल्ह्याने हल्ला केला. संतोष यांच्या चेहऱ्यावर व पायाला चावा घेतल्याने जखमेला सहा टाके घालावे लागले. या प्रकाराने मळ्यात राहणाऱ्या नागरिकात भीतीचे वातावरण आहे.

परिसरांत उसाचे क्षेत्र प्रचंड वाढल्याने कोल्ह्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सायंकाळपासून पहाटेपर्यंत सर्वदूर "कोल्हेकुई" ऐकू येत असते. वांगीच्या पश्चिमेस असणाऱ्या सावंतमळ्यात राहणारे संतोष हे काल (ता.17) सायंकाळी ७ वाजता घरामागील उसाच्या शेतात पाणी लावायला गेले असता एका कोल्ह्याने त्यांचेवर हल्ला केला. प्रथम पायाला चावा घेतला असता ते कोसळले. नंतर चेहऱ्याला चावा घेतला व अंगावर ओरखडले. संतोष यांनी आरडाओरडा केल्यावर घरातील लोक पळत आले.  त्यामुळे कोल्ह्याने तेथून पळ काढला. संतोष यांना तात्काळ चिंचणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. आज पुढील उपचारासाठी सांगलीला पाठविण्यात आले.

दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे वांगीच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व मळ्यात राहणारे नागरीक भेदरले आहेत. कारण सर्वत्र ऊसमळे आहेत आणि त्यातून रोज कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज कानावर पडत असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com