सोलापूर विद्यापीठाला एक रौप्य, दोन ब्रॉंझ पदक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

हॅंडबॉलमध्ये सोलापूर विद्यापीठ उपांत्य फेरीत 
राज्यस्तर आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात सिंहगड कॉलेजच्या मैदानावर आज झालेल्या हॅंडबॉल स्पर्धेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने विजयी घोडदौड सुरू ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

सोलापूर : 23व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठला दुसऱ्या दिवशी एक रौप्य व दोन ब्रॉंझ पदक मिळाले आहेत. 

सोलापूर विद्यापीठाच्या ऍथलेटिक्‍स मैदानावर स्पर्धा सुरू आहेत. डी. बी. एफ दयानंद महाविद्यालयाच्या रितेश इतपे याने 400 मीटर धावण्यात (50.1 सेंकद) प्रकारात ब्रॉंझ पदक मिळवून दिले. बार्शीच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या ज्योती बनसोडे हिने गोळाफेकमध्ये रौप्य पदक (11.15 मीटर) पटकाविले. बार्शीच्या पी. बी. सुलाखे महाविद्यालयाच्या निखिल शिंदे याने भालाफेकमध्ये चौथा क्रमांक मिळवला. चौथ्या क्रमांकाला ब्रॉंझ पदक देणार असल्याची माहिती सोलापूर विद्यापीठाचे माजी समन्वयक किरण चौकाकर यांनी दिली. 

Image may contain: 21 people, including Salim Shaikh, Ajurajan C.somarajan and Mohan Koli, people smiling
सोलापूर : विजयी संघासमवेत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, संचालक डॉ. एस. के. पवार, सिनेटर प्रा. सचिन गायकवाड, प्रा. अरविंद वाघमोडे, प्रा भक्तराज जाधव, व्यवस्थापन सदस्य ऍड. मंकणी आदी. 

अंतिम निकाल : (सुवर्ण, रौप्य, ब्रॉंझ पदक) ः महिला गट ः 100 मीटर धावणे ः चौत्राली गुजर (12.1 सेंकद, कोल्हापूर), स्वरोज शेट्टी (12.3, मुंबई), कीर्ती भोईटे (12.4, मुंबई), 400 मीटर धावणे ः निधी सिंग (59.2 सेंकद, मुंबई), सोनाली पवार (60.7, औरंगाबाद), शीतल पाटील (61.8, कोल्हापूर), पाच हजार मीटर धावणे ः कोमल जगदाळे (17.13.7, मिनिटे, पुणे विद्यापीठ, मूळची सोलापूर), पूनम सोनुने (17.53.6,पुणे), रेश्‍मा केवट (18.23.9, कोल्हापूर), उंड उडी ः निकिता सभेराव (1.59. मीटर, पुणे), समीक्षा उपरीकर (1.59 मीटर, अमरावती), स्नेहल हर्डे (1.56., औरंगाबाद), गोळाफेक ः पूर्णा रौराने (14.79, मुंबई), ज्योती बनसोडे (11.60, सोलापूर विद्यापीठ), नंदिनी पांढरे (11.15, कोल्हापूर) 

Image may contain: one or more people, people playing sports, tree, basketball court, shorts, sky and outdoor

दुपारी झालेल्या सामन्यात सोलापूर विद्यापीठ संघाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संघावर 24-2 अशा फरकाने सहज मात केली. सोलापूरने मध्यंतरापर्यंत 14 गोल केले होते. तर, डॉ. पं. दे. कृषी विद्यापीठ अकोलाने अवघा एक गोल केला होता. संगमेश हिरेमठ हा सामनावीर ठरला. या विजयाने सोलापूर विद्यापीठ संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला असून या फेरीत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संघाशी लढत होणार आहे. अन्य सामन्यांचा निकाल पुढील प्रमाणे : आरटीएम नांदेड वि. वि. उत्तर महाराष्ट्र, जळगाव 28-14 (सामनावीर : आकाश हुलगे- आठ गोल), संत गाडगेबाबा, अमरावती वि. वि. बामू, औरंगाबाद 37-28 (सामनावीर : तेजस बनसोडे- 10 गोल), वसंतराव नाईक, परभणी वि. वि. डॉ. पं. दे. कृषी विद्यापीठ, दापोली 25-13 (सामनावीर : प्रणव उरकुडे- 12 गोल). दरम्यान, या स्पर्धेसाठी समन्वयक आनंद चव्हाण, डॉ. के. सी. मुजावर तर, पंच प्रमुख म्हणून सुहास जाधव हे काम पाहत आहेत. सकाळी आठ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेत सामने पार पडत आहेत. 

Image may contain: 1 person, sky, shorts, basketball court and outdoor

खो खो : औरंगाबाद व सोलापूरची घोडदौड 
पुरुष गटात औरंगाबाद व सोलापूर विद्यापीठाने दोन विजय मिळवीत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. यजमान पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने लोणेरेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठावर 17-7 असा एक डाव राखून 10 गुणांनी धुव्वा उडविला. त्यांच्या आकाश हजारे (2.50 मिनिटे नाबाद व दोन गुण आणि अक्षय सावंत 2.10 मि. व तीन गुण), साबीर बारसकर (4.00 मि. व दोन गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. लोणेरेकडून दीपक पाटील (2.10 मि. व तीन गुण) याची लढत अपुरी पडली. दुसऱ्या सामन्यात सोलापूर विद्यापीठाने बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीवर 15-7 अशी डावाने मात केली. यात सुहास आसबेने (3.30 मि. व चार गुण) अष्टपैलू कामगिरी केली. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठावर 15-7 असा एक डाव राखून आठ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या सूरज शिंदे व लखन चव्हाण यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या डावात पाच मिनिटे संरक्षणाचा किल्ला लढविला. सूरजने दोन व लखनने एक गडीही बाद करीत अष्टपैलू कामगिरी केली. दापोलीकडून ओंकार कोरेची (1.10 मि. व 1 गुण) एकाकी लढत अपुरी पडली. दुसऱ्या सामन्यात औरंगाबादने लोणेरेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठावर 28-4 अशी एक डाव राखून 24 गुणांनी मात केली. यात औरंगाबादच्या अविनाश देसाई (2.00 मि. व चार गुण) व पियुष घोलप (2.30 मि. चार गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर 12-11 असा एक गुण आणि 4.10 मिनिटे राखून विजय मिळविला. त्यांच्या सुरेश सौरभ याने 1.10 मिनिटे नाबाद, 1.50 मिनिटे संरक्षण करीत तीन गडी टिपले. उमंग मेश्राम याने 3.40 व 2.00 मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. नांदेडकडून शुभम जाधव (1.40 मि. व तीन गुण) व व्यंकटी महात्मे (2.10, 1.00 मि.) यांची लढत एकाकी ठरली. 

Image may contain: one or more people, basketball court and outdoor

महिला गटाचे निकाल 
महिला गटात शिवाजी विद्यापीठाने गौंडवाना विद्यापीठ गडचिरोलीस 16-5 असे डावाने नमविले. यात मोनाली शिंदे नाबाद 3.00 मिनिटे व गुण आणि कोमल शिंदेने 3.00 मि. व चार गुण मिळवीत संघाच्या विजयात अष्टपैलू खेळ केला. दुसऱ्या सामन्यात अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास 11-6 असे एक डाव राखून पाच गुणांनी नमविले. यात स्वाती लांजेवारने 2.30 मि. नाबाद व दोन गुण आणि पूर्वा पावडेने 3.20 मि. व दोन गुण यांची कामगिरी संघास सहज विजय मिळवून दिली. अन्य निकाल : पुरुष : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : 11 (अरुण गुणकी 1.00 व 2.00 मिनिटे नाबाद आणि चार गुण, सुनील वाघमारे 3.00 मि.) वि. वि. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर : 10 (लोकेश भांडवलकर 1.30 मि. व तीन गुण) एक गुण आठ मिनिटे राखून. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : 16 (प्रवीण मगर 2.20मि. व दोन गुण, आकाश खाडे पाच गुण) वि. वि. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक : 7 (प्रणय मुळूमकर 1.10 मि.) एक डाव नऊ गुणांनी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी : 12 (दीपक वणवे 2.00 मि. व तीन गुण, सुरेश कोलते 2.50) वि. वि. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूर : 5 (हनुमान अरसाळे दोन गुण) एक डाव सात गुणांनी. मुंबई विद्यापीठ : 20 (शुभम शिगवन 2.00 मि. व सात गुण, निखिल कांबळे 3.00 मि. व एक गुण) वि. वि. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : आठ (राकेश पवार 1.00 मि. व तीन गुण) एक डाव 12 गुणांनी. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव : 20 (लक्ष्मण वसाळे 3.30, 2.10 मि. व तीन गुण) वि. वि. गौंडवाना विद्यापीठ, गडचिरोली : 15 (आतिश मेश्राम 1.20 मि. नाबाद व पाच गुण) पाच गुणांनी. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : 13 (सत्यजित सावंत 1.00 मि. पाच गुण आणि काशीलिंग हिरेकुर्ब 3.30 मि. व एक गुण ) वि. वि. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला : तीन (शुभम पाटील 1.00 मि.) एक डाव 15 गुणांनी. सावित्रीबाई फुले पुणे : 13 (पियुष भंगाळे 1.50, 1.00 मि. व चार गुण आणि गणेश राठोड 2.20 मि. ) वि. वि. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती 12 (विकी खेवले 1.10 मि. व 4 गुण ) एक गुण व 4.10 मिनिटे राखून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर : 18 (खैबर अली 5.00 मि. व तीन गुण आणि नमन वाकोडीकर 3.40 मि. व तीन गुण) वि. वि. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी, परभणी : तीन (सुरेश कोलते 1.00 मि. व दोन गुण) एक डाव 15 गुणांनी. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, नांदेड : 18 (शुभम जाधव 2.00 मि. व पाच गुण) वि. वि. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक : 10 (प्रणय गुळूमकर तीन गुण) एक डाव आठ गुणांनी. मुंबई विद्यापीठ : 11 (शुभम शिगवन 2.10, 1.40 मि. नाबाद व चार गुण) वि. वि. गौंडवाना, गडचिरोली : 10 (दिनेश चिंचोळकर 1.50 मि.) एक डाव एक गुणांनी. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, जळगाव : 16 (श्रीराम कोकणी 2.10, 1.00 मि. व 3 गुण) वि.वि. महात्मा फुले कृषी, राहुरी : 11(अविनाश कोळी 4 गुण ) महिला : सावित्रीबाई फुले, पुणे : 16 (गायत्री धमाले 2.30, 1.30 मि. व 2 गुण) वि. वि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, औरंगाबाद : 8 (पूजा सोळंके 2.00 मि. 3 गुण). 

Image may contain: 2 people, people playing sports, basketball court and outdoor

कबड्डी : सोलापूर विद्यापीठाचा दुसरा विजय 
पुरुषांच्या गटात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व वसंतराव नाईक विद्यापीठ परभणी यांच्यात झालेल्या सामन्यात सोलापूर विद्यापीठाने परभणी विद्यापीठाचा धुव्वा उडवत 50-12 गुणांनी हा सामना जिंकला. सोलापूरच्या खेळाडूंनी सामन्यात पहिल्यापासून आक्रमक खेळ केला. सोलापूर विद्यापीठाने साखळी सामन्यातील हा दुसरा विजय मिळविला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांच्यात झालेला सामना सावित्रीबाई फुले विद्यापीठाने 57-27 अशा फरकाने जिंकला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नागपूरमध्ये झालेला सामना शिवाजी विद्यापीठाने 49-22 गुणांनी जिंकला. मुंबई विद्यापीठ मुंबई व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नागपूर यांच्यात झालेला सामना मुंबई विद्यापीठाने 38-27 गुणांनी जिंकला. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व स्व. रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांच्यात झालेला सामना नांदेड विद्यापीठाने 39-27 गुणांनी जिंकला. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्यात झालेला सामना अमरावती विद्यापीठाने 44-09 गुणांनी जिंकला. महिलांच्या गटात सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यात झालेला सामना पुणे विद्यापीठाने 36-2ने जिंकला. यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिक व वसंतराव नाईक विद्यापीठ परभणी यांच्यात झालेला सामना यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने 78-14 गुणांनी जिंकला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यातील सामना औरंगाबाद विद्यापीठाने 82-13 गुणांनी जिंकला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व स्व. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्यातील सामना शिवाजी विद्यापीठाने 66-23 गुणांनी जिंकला. मुंबई विद्यापीठ मुंबई व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्यातील सामना मुंबई विद्यापीठाने 59-13 गुणांनी जिंकला. एसएनडीटी मुंबई व संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांच्यात झालेला सामना एसएनडीटीने 31-23 गुणांनी जिंकला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One silver, two bronze medals to Solapur University