वृद्धापकाळाला कंटाळून एकाची आत्महत्या

राजकुमार शहा 
मंगळवार, 24 जुलै 2018

वृद्धापकाळाला व गजकर्ण या आजाराला कंटाळुन एका सत्तर वर्षीय वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना कोळेगाव ता मोहोळ शिवारात घडली वसंत प्रल्हाद ताकमोगे रा. शिरापूर असे मृताचे नाव आहे. 
 

मोहोळ- वृद्धापकाळाला व गजकर्ण या आजाराला कंटाळुन एका सत्तर वर्षीय वृद्धाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना कोळेगाव ता मोहोळ शिवारात घडली वसंत प्रल्हाद ताकमोगे रा. शिरापूर असे मृताचे नाव आहे. 

मोहोळ पोलिसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार मृत वसंत ताकमोगे हे वृद्धाप व गजकर्ण या आजाराने त्रस्त होते आज सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास वसंत हे घरातुन दवाखान्यात जातो म्हणुन बाहेर पडले त्यांनी आजाराला कंटाळुन कोळेगाव शिवारातील डॉ़ खान यांच्या शेताजवळील रेल्वे दगड क्र. 423/4 व 423/5 च्या मधे रेल्वेखाली आत्महत्या केली

या घटनेची खबर रामकृष्ण वसंत ताकमोगे रा. शिरापूर यांनी मोहोळ पोलिसात दिली असुन पुढील तपास हवालदार लोबो चव्हाण व एम आर कटक धोंड करीत आहेत.

Web Title: One suicides due to old age