कवठेत पुन्हा फेकला ट्रकभर प्लास्टिक कचरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

कवठे : राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असली तरी अजूनही काही महाभाग कंपनीचा, हॉटेलमधील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चोरुन रात्री अपरात्री ग्रामीण भागात कचरा फेकत आहेत. विशेषत गावापासून दूर व लोकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी प्लास्टिक टाकण्याचे प्रकार होत आहेत. कवठे (ता. वाई ) येथील डोंगरवस्तीच्या निर्मनुष्य भागातील ओघळीत, गावातील युवकांना अज्ञात वाहनातून जवळपास ट्रकभर प्लास्टीक कचरा एका ओघळीत खाली केल्याचे दिसून आले.

या कचऱ्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली असून, नागरीकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक कचऱ्याबाबत कवठे परीसरातील संबंधीत सर्वच यंत्रणा डोळेझाक व दुर्लक्ष करीत असल्याने, प्लास्टिक कचरा फेकणारे चांगलेच निर्धावले असून, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी निर्जन ठिकाणी फेकण्याचे खुलेआम धाडस करीत आहेत. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, गावामध्ये आठवड्यातच दुसऱ्यांदा प्लास्टिक कचरा फेकण्याची घटना घडल्याने नागरीकांतून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त होत आहे.

काल कवठे परीसरातील युवक डोंगराववील देवदर्शनावरुन माघारी येत असताना, त्यांना एका ओघळीत प्लॅस्टिकच्या काळ्या बॅगांमध्ये पाउच, पिशव्या, कागद, रिकाम्या बाटल्या आदी प्लास्टिक कचरा अस्ताव्यस्त टाकल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे हा कचरा दिसू नये यासाठी त्यावर माती टाकण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसून येते. आहे. 

गत आठवड्यात कवठे गावच्या हद्दीतील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गा नजीकच्या ओढ्यात असाच जवळपास एक ट्रकभर केमिकलयुक्त प्लास्टिक कचरा अज्ञात वाहनातून टाकण्यात आला होता. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच संबंधिताने कारवाईच्या व दंडाच्या भीतीने हा सर्व प्लास्टिक कचरा पेटवून दिला होता. त्यामुळे पेटविण्या अगोदर केमिकलची व नंतर पेटविल्यामुळे प्लास्टिकची दुर्गंधी असा दुहेरी सामना परीसरातील नागरीकांना करावा लागला होता. 

या प्रकाराबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तांबे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहीती नसल्याचे सांगून, पाहणी करणार असल्याचे जुजबी उत्तर दिले. परंतू गेल्या दोन दिवसात या गंभीर प्रकाराची कोणीही दखल घेतली नाही किंवा पाहणीही केली नाही. वाईचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुसुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, संबंधित ग्रामसेवकांनी पाहणी व कारवाई करणे होते. याबाबत त्यांना आजच्या बैठकीत विचारु एवढेच सांगितले.

Web Title: one truck Plastic waste thrown in kavthe