खंडणीसाठी येथील एकाचे अपहरण करून मारहाण; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

सातारा : एकवीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी येथील एकाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी सिंहगडरोड (पुणे) येथील विकास बाळासाहेब म्हस्के याच्यासह सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुनीर अब्दुलगैब पट्टणकुडे (रा. गुरूवार पेठ, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

सातारा : एकवीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी येथील एकाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी सिंहगडरोड (पुणे) येथील विकास बाळासाहेब म्हस्के याच्यासह सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुनीर अब्दुलगैब पट्टणकुडे (रा. गुरूवार पेठ, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

2016 मध्ये त्यांची पुणे येथील सिंहगडरोडवर राहणाऱ्या म्हस्केंशी शासकीय एलईडी बल्ब विक्रीच्या कारणावरुन ओळख झाली. पाच लाख रुपये अनामत रक्कम देऊन या बल्बची एजन्सी घ्या असे त्याने मुनीर यांना सांगितले होते. एवढी रक्कम देणे शक्‍य नसल्याचे त्यांनी त्याला सांगितले. तसेच कमशीनवर बल्ब विक्री करण्याची तयारी दर्शवीली. त्यानुसार मुनीर यांनी त्यांच्याकडून बल्ब घेऊन विक्री केली. त्यातून मिळालेले अडीच लाख रुपये त्यांनी म्हस्केच्या सांगण्यावरून बडोदा येथील हेलेक्‍स या कंपनीच्या खात्यावर वेळोवेळी भरली. त्यानंतर कमीशन देण्याची विनंती त्यांनी म्हस्के यांच्याकडे केली. त्या वेळी बल्ब विकलेल्या ग्राहकांची यादी, त्यांची लाईटबिले जमा केल्याशिवाय कमिशन देणार नाही, असे त्याने सांगितले. मात्र, विक्री सुरू करण्यापूर्वी असे सांगितले नव्हते याकारणावरून दोघात वाद झाला. त्यानंतर कमीशन देण्याऐवजी कागदपत्र जमा नकेल्याने 21 लाख रुपयांचे नुकासन झाल्याचे सांगत म्हस्के यांनी मुनीर याच्यांकडे पैशाची मागणी सुरू केली. त्यामुळे मुनीर त्रस्त झाले.

14 फेब्रुवारी 2018 नंतर पैशासाठी म्हस्के याने घरी येवून मुनीर त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यासाठी त्याने येथील पैलवानांचीही मदत घेतली. त्यामुळे मुनीर व त्यांचे कुटुंबीय घाबरले होते. रविवारी (ता. 24) सकाळी म्हस्केने फोन करून मुनिर यांना येथील तालीम संघाजवळ बोलावले. त्यामुळे त्यांच्या स्वीफ्ट कारमधुन मुनीर तेथे गेले. त्या वेळी म्हस्केसोबत पैलवानही होते. त्यांनी मुनीर यांना त्यांच्याच गाडीतून बॉंबे रेस्टॉरंट चौकात नेले. तेथे 21 लाख रुपये न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. मुनीर यांनी कशीबशी त्यांच्यातून सुटका करून घर गाठले. कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यांनतर त्यांची पत्नी फरजाना यांनी काल रात्री याबाबत शहर पोलिसठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा जणांवर अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One was kidnapped for ransom case file in police station