मार्केट यार्ड चौकात ट्रेलरच्या धडकेने महिला ठार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सोलापूर - मार्केट यार्ड चौकात जड वाहतूकीच्या काळात ट्रेलरच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. उषाबाई देवीदास शिंदे (वय 45, रा. कुमारस्वामी नगर, शेळगी, सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

मार्केट यार्ड चौकात दुपारी दीडनंतर जड वाहनांची वाहतूक सुरु होते. याच काळात हा अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषाबाई या मुलगी सोनाली हिला भेटण्यासाठी मार्डी गावाला गेल्या होत्या. मुलीला भेटून त्या परत सोलापूर बसस्थानकावर आल्या. तेथून त्या रिक्षाने मार्केट यार्डात चौकात आल्या. रिक्षातून उतरल्यानंतर त्या चालत शेळगीच्या दिशेने घराकडे निघाल्या होत्या. बोरामणी नाक्‍याकडून आलेल्या ट्रेलरने (क्र. एच.आर. 38 यु 7704) उषाबाई यांना धडक दिली. या घटनेत उषाबाईंचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेनंतर काही वेळ मार्केट यार्ड चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ट्रेलर आणि चालक अब्दूल हमीर गफूर (वय 42, हरीयाना) यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One Women died in trailer accident in solapur