साताऱ्यात झालेल्या गोळीबारात एक गंभीर जखमी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

बुधवार नाका येथे आज सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत नुकतेच लग्न ठरलेली एक युवती जखमी झाली आहे. भर दिवसा झालेल्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अश्‍विनी कांबळे (रा. बुधवार पेठ) असे त्या युवतीचे नाव आहे.

सातारा - बुधवार नाका येथे आज सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत नुकतेच लग्न ठरलेली एक युवती जखमी झाली आहे. भर दिवसा झालेल्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अश्‍विनी कांबळे (रा. बुधवार पेठ) असे त्या युवतीचे नाव आहे.

बुधवार नाका येथील समाज मंदीराजवळ अरिहंत जनरल स्टोअर्स या नावाचे दुकान आहे. त्याच परिसरातच अश्‍विनी राहते. नुकताच तिचा विवाह ठरला होता. भावाच्या लहान मुलाला घेऊन ती दुकानाकडे निघाली होती. यावेळी रिक्षातून आलेल्या एका युवकाने दुकानाजवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या युवकाच्या दिशेने गोळीबारकेला. मात्र, त्याचा गोळी चुकुन अश्‍विनीच्या छातीमध्ये लागली. त्यामुळे ती मुलासह रस्त्यावर कोसळली. गोळीबाराच्या आवाजामुळे नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. तोपर्यंत गोळीबार करणारा पसार झाला.

नागरिकांनी रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या अश्‍विनीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभिर असल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. गोळीबार करणाऱ्यांचे तसेच कोणावर गोळीबार करायचा होता त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा बुधवार पेठेत दाखल झाला आहे.

Web Title: one women serious injured in firing