इंदापूर तालुक्यातील अकोले येथील बोगद्यामधील क्रेन दुर्घटनेला एक वर्षे पूर्ण

walchandnar
walchandnar

वालचंदनगर - अकोले (ता.इंदापूर) येथील नीरा -भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यामध्ये गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज मंगळवार (ता.२०) रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. या अपघातामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सात परप्रांतीय व एका स्थानिक युवकाचा समावेश होता.अपघातानंतर संबधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षीतेच्या साधनामध्ये वाढ केली असून कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा करण्यासाठी स्वतंत्र लिप्ट बसविण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा व भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम इंदापूर तालुक्यामध्ये २००९ पासुन सुरु आहे.काही वर्षे हे काम बंद होते. यानंतर गेल्या दीड वर्षापूर्वी हे वेगाने सुरु करण्यात आले होते. मात्र गतवर्षी २० नोव्हेंबर रोजी अकोले येथे पाच क्रंमाकाच्या शाप्टमध्ये रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कामगार काम संपवून वरती येत असताना अचानक क्रेनमध्ये बिघाड झाला. बकेटमध्ये उभे असलेले आठ कर्मचारी सुमारे २१० फुट खोल बोगद्यामध्ये पडले. या दुर्घटनेमध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर सोमा-मोहिते इंटरप्रायझेस या कंपनीने कामगारांच्या सुरक्षतेच्या साधनामध्ये वाढ केली आहे. 

सोनगाव-तावशी-सपकळवाडी-सणसर-काझड-शिंदेवाडी-अकोले-भादलवाडी या गावामधून हा बोगदा जाणार आहे.बोगद्याचे कामे जमीनीपासुन सुमारे ७० ते ९० मीटर खाली सुरु असून याची रुंदी ८ मीटर,उंची ८.२५ मीटर व २४ किलोमीटर लांबीमध्ये होणार आहे. सध्या शिंदेवाडी, अकोले-१,अकोले-२ व भादलवाडी येथे चार ठिकाणी काम सुरु असून सुमारे ४ कि.मी लांबीचे काम पूर्ण झाले असून उर्वर्रित २०कि.मी. लांबीमध्ये काम पूर्ण होण्यासाठी पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागणार आहे. या बोद्यामध्ये सुमारे ३०० कामगार रात्रंदिवस काम करीत आहेत.

बोद्यामध्ये ये-जा करण्यासाठी स्वतंत्र लिप्ट...
गतवर्षी कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा करण्यासाठी बकेटचा वापर केला जात होता.मात्र अपघातानंतर कंपनीने ये-जा करण्यासाठी स्वतंत्र लिप्ट बसवलेली आहे.ही लिप्ट वायर रोप ऐवजी गिअरवरती चालत असून रोप तुटण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नसल्याने भविष्यात अपघात होणार नसल्याने  कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच बोगद्यामध्ये काम करताना कामगारांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन (प्राणवायू) मिळावा यासाठी मोठे ब्लोअर बसविणण्यात आले आहे. हेल्मेट,शूज,सेप्टी जॅकेट शिवाय बोगद्यामध्ये प्रवेश दिला जात असून कुशल कामगारांनाच बोगद्यामध्ये काम करण्याची परवानगी दिली जाते. प्रत्येक युनिटवरती स्वतंत्र सेप्टी मॅनेजरची नेमणूक केली अाहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com