आता 'या' गावात केली जातेय कांद्याचीही राखण

गजेंद्र पोळ
शनिवार, 7 डिसेंबर 2019

अवेळी झालेल्या पावसामुळे  खरिपातील कांदा वाया गेला. उशिरा केलेल्या लागवडी थोड्याफार तग धरून आहेत. या शेतकऱ्यांमध्ये सध्या मिळणाऱ्या चांगल्या भावामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाग झालेला कांदा चोरी जाण्याची भीतीही निर्माण झाले आहे.

चिखलठाण (सोलापूर) : कांद्याला मिळणारा चांगला दर यामुळे कांदा चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे चक्क कांद्याच्या शेताची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आजपर्यंत शेतकरी आपल्या शेतातील ज्वारीच्या पिकाची राखण पाखरांपासून करीत असे फारच झालं तर द्राक्ष, डाळिंब अशी पिके घेणारा शेतकरी आपल्या पिकांची राखण करतो. 

Image may contain: plant, grass, outdoor and nature

हेही वाचा : अभिमानास्पद! 'या' खेड्यातील डाळिंब गेले युरोपीय बाजारपेठेत..!

कांदा चोरी जाण्याची भीती

शेतात दोन- दोन ट्रक कांदा पसरलेला आसला तरी त्याची राखण शेतकरी कधी करत नाही. परंतु सध्या बाजारात कांदा चांगलाच भाव खाऊ लागला असून फारच थोड्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे  खरिपातील कांदा वाया गेला. उशिरा केलेल्या लागवडी थोड्याफार तग धरून आहेत. या शेतकऱ्यांमध्ये सध्या मिळणाऱ्या चांगल्या भावामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाग झालेला कांदा चोरी जाण्याची भीतीही निर्माण झाले आहे. त्यामुळे कधीही कांदा पिकाची राखण न करणारा शेतकरी आपल्या शेतात कांदा राखणीसाठी जात असल्याचे चित्र चिखलठाण (करमाळा) परिसरामध्ये पहावयास मिळत आहे. 

Image may contain: plant, grass, sky, tree, flower, outdoor and nature

हेही वाचा : कांद्याने मोडले सारे विक्रम!
निवडून नेलेल्या कांद्यालाच भाव

कांद्याला बाजारात मिळणार्या भावाची सर्वत्र चर्चा होत आसली तरी शेतकऱ्यांना फारच फायदा होत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु सध्या बाजारात विकायला येणारा कांदा हा शेतकऱ्याने निवडून नेलेला कांदा आहे. जिथे २०० गोणी कांदा निघणार होता. त्या कांद्याच्या शेतातून फार तर चार ते पाच गोण्या कांदा चांगला निघत आहे. त्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि  भाव याचा विचार केल्यास कांदा उत्पादक शेतकरी शेतकरी एवढा दर मिळूनही तोट्यातच आहे. जादा भाव मिळालेल्या शेतकऱ्यांच्या पट्टीकडे पाहीले तर कांदा चार पाच गोण्यापेक्षा जादा नसतो ही वस्तुस्थिती आहे.

Image may contain: 1 person, standing, beard, sky, outdoor and nature

खर्चाच्या मानाने उत्पन्न काहीच नाही
माझा पाच एकर कांदा होता. किमान पाचशे गोणी कांदा अपेक्षीत आसताना केवळ ३० ते ३५ गोणी चांगला कांदा निघाला आहे. कांद्याला दर चांगला मिळत आसला तरी खर्चाच्या मानाने उत्पन्न काहीच नाही.
- किरण पोळ, शेतकरी, शेटफळ
 

Image may contain: one or more people, people standing, outdoor and nature

पावसाने कांदा नासून गेला
मी कांदा पिकाचा वाटा केला होता. पावसाने कांदा नासून गेला. जो वाचला आहे त्याला भाव चांगला आसल्याने तो चोरी जाण्याची भिती आसल्याने या कांद्याची राखण करत आहे.
- संतोष कन्हेरे, शेतकरी, चिखलठाण नंबर २


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The onion is also being preserved