श्रीरामपुरात कांदा लिलाव बंद 

Onion auction closed in Shrirampur
Onion auction closed in Shrirampur

श्रीरामपूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याने येथील बाजार समितीतील कांदा लिलाव उद्यापासून (ता. 1) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली होती. त्यात पूर्वीचाच कांदा जागेवर पडून होता. तसेच शेतकऱ्यांनाही बाजारभाव मिळत नसल्याने कांदा लिलावच बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी व बाजार समितीने घेतल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.

देशभरात संचारबंदी लागू असल्याने मालवाहतूक ठप्प झाली आहे. शेजारील राहुरी, राहाता, घोडेगाव येथील कांदा लिलाव बंद आहेत. त्यामुळे येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे. परिणामी, कांद्याचे भावही कोसळले आहेत. मात्र, अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विकत आहेत. 

बाजार समितीत रविवारी (ता. 29) सुमारे 15 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. त्यास 1400 ते 1600 रुपये क्विंटल भाव मिळाला. त्यातील फक्त सात हजार गोण्यांची वाहतूक झाली. उर्वरित गोण्या येथेच पडून आहेत. असे असताना आजही सुमारे 20 हजार गोण्यांची आवक झाली.

बाजारातील वाढती आवक आणि ठप्प झालेली वाहतूक, यामुळे कांद्याचे व्यवहार थांबले आहेत. अशा परिस्थितीत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काळे यांनी दिली. 

बाजार समितीत आज हमाल नसल्यामुळे शेतकऱ्यांवरच गोण्या उचलण्याची वेळ आली. पोलिस प्रशासनाने गर्दी कमी करण्याची सूचना केली. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आज बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com