कांदा लागवडीसाठी बळिराजाची उसनवारी 

कांदा लागवडीसाठी बळिराजाची उसनवारी 

सोलापूर - सरकारकडून राज्यातील चार लाख शेतकऱ्यांना मागील साडेचार महिन्यांपासून 387 कोटी रुपयांचे कांदा अनुदान मिळाले नाही. त्यामुळे आता बळिराजा पेरणी व बियाण्यांसाठी पैसे उसनवारीने घेण्यासाठी दारोदारी भटकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंग असलेल्या नेत्यांनी विधानसभा अधिवेशनात अनुदानाची मागणी केली अन्‌ ती मंजूरही झाली. परंतु, अद्याप वित्त विभागाकडून ही रक्‍कम पणन विभागाकडे वर्ग झालेली नाही. खरीप पेरणीसाठी पोषक असा पाऊस राज्यातील अनेक भागांमध्ये झालेला नाही. मात्र, पावसाच्या आशेवर बळिराजाने पेरणीची तयारी सुरू केली आहे. यात दुष्काळामुळे बॅंकेचे कर्ज थकले, कर्जमाफीचा लाभ मिळेना, तूर-हरभरा अनुदान नाही, उसाची "एफआरपी' अडकली आणि आता कांदा अनुदानाची प्रतीक्षा, यासह अन्य कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

मागील वर्षीचे खताचे पैसे थकल्याने खत दुकानदारही उधार देईना अन्‌ आता मशागत व बियाण्यांसाठी पैसेच नाहीत, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील 73 बाजार समित्यांमध्ये तीन लाख 93 हजार 300 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी अर्ज केले. त्यानुसार बाजार समित्यांनी 387 कोटी रुपयांची मागणी पणन विभागाकडे केली. मात्र, अद्याप पैसे मिळालेले नाहीत. 

कांदा अनुदानासाठी अधिवेशनात केलेली पुरवणी मागणी मंजूर झाली आहे. परंतु, वित्त विभागाकडून अद्याप रक्‍कम मिळालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. 
- यू. एस. घाद्याळे, उपसचिव, पणन विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com