कांदा जळाल्याने शेतकऱ्यांचे 20 कोटींचे नुकसान

मार्तंडराव बुचुडे 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पारनेर -  तालुक्यातील वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, म्हसोबा झाप, कर्जुले हर्या आणि कासारे परीसरातील सुमारे शंभर शेतकऱ्यांनी आपल्या कांदा पीकावर 'पार्टनर' हे औषध फवारले. परंतु, त्यामुळे या शेतकऱ्यांचा सुमारे 60 ते 70 एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केलेल्या कांद्याचे संपूर्ण पीक जळाले आहे.

कांदा जळाल्याने या शेतकऱ्यांचे सुमारे 20 कोटीहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. याबाबत राहुरी कृषी विध्यापीठाच्या तज्ञांनी आज पहाणी केली असून, या औषधाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 

दरम्यान, 21 शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांच्या कडे यासंबधी कंपनी विरोधात तक्रार केली आहे. त्याची दखल घेत दरेकर यांनी स्वताः पहाणी करून जळालेल्या पिकाच्या पहाणीसाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ञांना बोलावले. संबधीत तज्ञांनी पहाणी केली असून, त्याचा अहवाल तयार केला आहे. तसेच या औषधाचे नमुनेही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असल्याचे दरेकर यांनी सांगीतले. 

या प्रकरणी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी दरेकर यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.     

जळालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी ऊपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी दरेकर, राहुरी कृषी विध्यापीठाचे कृषी कांदा पैदास अधिकारी डॉ. विनायक जोशी, वनस्पती रोग शास्त्रज्ञ चिमाजी बाचकर, किटक शास्त्रज्ञ सोमनाथ पवार, मंडल कृषी अधिकारी दिलीप कुलकर्णी आदी ऊपस्थीत होते.

Web Title: Onion farmers in parner demand compensation