कांद्याने बळिराजाला रडविले

Onion
Onion

सोलापूर - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यात कांदा पिकवला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रतिक्‍विंटल कांद्याला ९०० ते १७०० रुपयांपर्यंत दर अपेक्षित होता. मात्र, तो १०० ते ७५० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांचे तब्बल सोळाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून दोनशे रुपयांच्या अनुदानातून केवळ ११४ कोटी रुपयेच मिळणार असल्यामुळे यंदा शेतकऱ्याला कांद्याने रडविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये २०१७-१८ मध्ये शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल किमान ९०० ते कमाल ३६०० रुपयांचा दर मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत राज्यातील बाजार समित्यांमध्ये ५.४४ कोटी क्‍विंटल कांद्याची आवक झाली; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना यंदा अपेक्षित दर मिळालाच नाही.

काही शेतकऱ्यांना अक्षरश: कांदा विकल्यानंतर स्वत:हून पैसे भरावे लागल्याचेही पाहायला मिळाले. सरकारने जाहीर केलेल्या दोनशे रुपयांच्या अनुदानाला निकषांची चाळण लावली. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांची निराशा झाल्याचे दिसून येते.

ठळक बाबी...
    एकरी सरासरी अपेक्षित उत्पादन ४५ क्‍विंटल
    कांदा लागवडीसाठी एकरी सरासरी ३५ हजारांचा खर्च
    सद्यस्थितीत कांद्याला प्रतिक्‍विंटल दोनशे ते सातशे रुपयांचा दर
    लागवडीचा खर्चही निघेना, शेतकऱ्यांनी शेतातच गाढला कांदा
    बहुतांशी शेतकऱ्यांना स्वत:हून भरावे लागले पैसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com