पावसाच्या दणक्‍याने कांदा गडगडला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - शाहू मार्केट यार्डातील कांदा बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे, पावसामुळे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना जेमतेम भावात कांदा माल विकावा लागत आहे. कांदा साठवणुकीसाठी सक्षम पर्याय नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना कांदा कमी भावात विकावा लागला आहे. असे असले तरी राज्यभरातील इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापुरात जास्त भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कोल्हापूर बाजारपेठेत कांद्याची विक्री करण्याला प्राधान्य देत आहेत. 

जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन लक्षवेधी नाही, तरीही परजिल्ह्यांतून कांदा कोल्हापुरातील बाजारपेठेत येतो. शाहू मार्केट यार्डातील कांदा बाजारात हंगामात रोज ७० ते ८० गाड्या कांदा येतो. तर पावसाळ्यात आवक कमी होते. रोज १० ते १५ ट्रक कांदा आवक असते. यंदा राज्यभरात पावसाचा जोर असल्याने कांदा आवक आणखी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, लासलगाव, पुणे, सोलापूर बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी झाले. अशात कोल्हापुरात मात्र भाव चांगला असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा कोल्हापूर बाजारपेठेत आणला आहे.

तीन महिने पाऊस पडल्याने कांद्याचा साठा करता येत नाही, तो खराब होतो. त्यामुळे मिळेल त्या भावात कांदा बाजारात आणावा लागतो. त्यातून 
उत्पादन खर्च तरी निघेल 
एवढी आशा असते.
- श्रीधर गिरिवडेकर, कांदा उत्पादक, लोणंद

बाजारात अतिरिक्त आवक
चार दिवसांत पावसाची काहीशी उघडीप मिळाल्याचे पाहून लोणंद, श्रीगोंदा, अहमदनगर, पुणे या भागातून कांदा आला आहे. या कांद्याला दहा किलोसाठी कमी भाव ५०, तर जास्त भाव १३० असा मिळाला आहे. हा भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाचा जोर आहे. अशात कांदा साठवता येत नाही. कांदा खराब होण्याची शक्‍यता मोठी आहे. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन असलेला कांदा बाजारात आणला जात आहे.

Web Title: Onion rate Decrease by Rain