नेप्ती उपबाजारात पाच हजार रुपये क्विंटलने विक्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात लाल कांद्याला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव निघाला. पावसाअभावी शेतकऱ्यांना नाशिक लाल कांद्याची लागवड करता आली नाही. साठवलेला लाल कांदा व गावरान कांदाही संपल्याने बाजार समितीत आवक घटली आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत आज कांद्याने पन्नाशी गाठली. क्रमांक एकच्या कांद्याला चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव निघाला. बाजारात होणाऱ्या आवकेमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे कांदा भाव खात आहे.
नगर व मराठवाड्याच्या हद्दीवर असलेल्या औरंगाबाद, बीड, पैठण, पाथर्डी, आष्टी भागातून थोड्या-फार प्रमाणात सध्या लाल कांद्याची आवक होत आहे. या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. कांदा दिवाळीत ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणण्याची शक्‍यता आहे.
ज्यांच्यालडे थोड्या-फार प्रमाणात पाणी शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांचा लाल कांदा बाजारात विक्रीस येत आहे. हा कांदा संपल्यावर नव्याने लागवड झालेला कांदा बाजारात येण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. नवरात्रीदरम्यान लाल कांदा सहा हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion sells Rs 5,000 a quintal in Nepti sub-market