कांदा दहा हजारांच्या उंबरठ्यावर... 

दौलत झावरे
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

नगर : गावरान कांद्याला मागणी जास्त असून, आवक कमी होत असल्याने दिवसागणिक हा चांगलाच भाव खात आहे. या कांद्याने काल (शुक्रवारी) साडेआठ हजारांचा टप्पा ओलांडला होता. आज साडेनऊ हजारांचा टप्पा ओलांडून वर्षातील सर्वाधिक भाव मिळविण्याचा विक्रम केला आहे. 

त्यालाही चांगला भाव

नगर : गावरान कांद्याला मागणी जास्त असून, आवक कमी होत असल्याने दिवसागणिक हा चांगलाच भाव खात आहे. या कांद्याने काल (शुक्रवारी) साडेआठ हजारांचा टप्पा ओलांडला होता. आज साडेनऊ हजारांचा टप्पा ओलांडून वर्षातील सर्वाधिक भाव मिळविण्याचा विक्रम केला आहे. 

त्यालाही चांगला भाव

जिल्ह्यातील नेप्ती (ता. नगर), वांबोरी (ता. राहुरी) व घोडेगाव (ता. नेवासे) या तीन उपबाजारांमध्ये आज कांद्याचे लिलाव झाले. त्यात लाल व गावरान कांद्याच्या घोडेगावमध्ये 6598, नेप्तीत 13 हजार 595 व वांबोरीमध्ये 1342 अशी एकूण 21 हजार 529 गोण्यांची आवक झाली. यामध्ये गावरान कांद्याची आवक कमी असल्याने व त्याच्या भावाने साडेनऊ हजारांचा टप्पा ओलांडला. परतीच्या पावसात लाल कांदा भिजलेला असला, तरी त्यालाही चांगला भाव मिळत आहे. 

भाव दिवसेंदिवस वाढत चालले

घोडेगाव उपबाजार आवारातील लिलावात पाच गोण्यांतील गावरान कांदा उत्कृष्ट प्रतीचा असल्याने त्यांनाच दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव निघाला. उर्वरित कांद्याला 9600 रुपयांपर्यंतचा भाव निघाला. 
दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी भुसारात ठेवलेला गावरान कांदा आणि शेतात लागवड केलेला लाल कांदा जागेवरच सडला. त्यामुळे बाजारात कांद्याची कमी आवक झाली. परिणामी कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. 

गावरान कांद्याचे भाव 
नेप्ती : क्रमांक एक : 7600 ते 9000, दोन : 5100 ते 6500, तीन : 3100 ते 5000 
वांबोरी : क्रमांक एक : 7400 ते 9000, दोन : 6000 ते 7300, तीन : 1500 ते 5000, गोल्टी : 6000 ते 7500 
घोडेगाव : क्रमांक एक : 8500 ते 9600, दोन : 7500 ते 8000, तीन : 2500 ते 3000 

लाल कांद्याचे भाव 
नेप्ती : क्रमांक एक : 5100 ते 6500, दोन : 3100 ते 5000, तीन : 3000 ते 3600 
वांबोरी : क्रमांक एक : 3500 ते 5000, दोन : 1500 ते 3000, तीन : 500 ते 1400. 
घोडेगाव : क्रमांक एक : 5500 ते 6500 दोन : 1500 ते 2000, तीन : 1000 ते 1200. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion at the threshold of ten thousand ...