उत्पादकांनी कांदा फेकला शेतात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

देशभरात कांद्याला उच्चांकी दर मिळत आहे. यामुळे उत्पादक खूष आहेत. परंतु सोलापुरात आज (रविवारी) अशी एक घटना घडली की उत्पादकाने कांदा बाजार समितीत नेऊन विकण्याएेवजी तो शेतातच फेकला....

नरखेड (सोलापूर) : सोलापूर बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांद्याचा भाव 20 हजारांहून थेट 500 रुपयांवर खाली खेचल्याने मसले चौधरी (ता. मोहोळ) येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी नेलेला 50 क्विंटल कांदा परत आणल्याचे शेतकरी दीपक सिरसट यांनी "सकाळ'ला सांगितले. या वेळी त्यांनी कांदा भाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कांदा मातीमोल भावाने विकण्यापेक्षा किमान खत म्हणून तरी उपयोग होईल म्हणून शेतात फेकून दिला. 

हे ही वाचा... दुध उत्पादकांसाठी खूषखबर, अकरा डिसेंबरपासून खरेदी दरात वाढ

कांदा उत्पादनासाठी बियाणे, रोप तयार करणे, लागण, खुरपणी, खत, पाणी, वीज बिल, काढणी, कापणी, मजुरी व बाजार पेठेपर्यंत वाहतूक या सर्व उत्पादन प्रक्रियेचा खर्च व बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी ठरवलेला दराचा ताळेबंद वजाबाकीत व्यापारी पारंगत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा भाव 20 हजारांवर चढवून केवळ 500 रुपयांवर खाली आपटला. यातच 20 हजार रुपये दराची कसर भरून काढीत व्यापाऱ्यांनी आज मातीमोल दरात कांदा खरेदीत व्यापारी चाल दिसून आली म्हणून शेतकऱ्यांनी सोलापूर बाजारपेठेतून कांदा परत आणल्याचे चित्र सोलापूर बाजार समितीत दिसून आले. 

हे ही वाचा.... अरेच्चा...! बेळगावच्या बाजारपेठेत कांदा दरात घट, कसे काय...?

कांद्याचा बाजारभाव 20 हजार रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे सोलापूर बाजार समितीत शुक्रवारी व शनिवारी आंध्रप्रदेश, कर्नाटक व मराठवाड्यातून मोठ्याप्रमाणात 600हून अधिक ट्रक कांद्याची आवक झाली. याच संधीचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलत कांदा बाजार भाव जमीनदोस्त केला. दरम्यान, सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतीमालाची रात्री बरोबर दिवसाही चोर शेतमाल चोरतो. परंतु या चोरी बंद करण्यासाठी बाजार समितीकडे कोणतीही यंत्रणा नाही. शेतीमालाचे बाजारभाव व्यापारी हवे तसे ठरवतात. त्यामुळे व्यापारी व चोरांवर कुणाचेही नियंत्रण नाही हे स्पष्ट आहे. 

 

नियंत्रण नाही

सोलापूर बाजार समितीत व्यापारी व चोरांवर नियंत्रण कुणाचेच नाही. 
- दीपक सिरसट, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion tossed into the field