थकित 'ऑनलाइन' दंडाची पोलिसांकडून आजपासून वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online fines Police

थकित 'ऑनलाइन' दंडाची पोलिसांकडून आजपासून वसुली

मिरज : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘ओएसओसी’ यंत्राद्वारे आणि सीसीटीव्हीद्वारे वाहतूक पोलिसांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा ‘ऑनलाइन’ दंड विशेष मोहिमेद्वारे वसूल केला जाणार आहे. यासाठी ता. २० ते ३१ दरम्यान शहरातील प्रमुख चौकात वाहन तपासणी मोहीम राबवून दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन दंडाचा मेसेज येऊनही भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनधारकांना आता दंड भरावा लागणार आहे.

मिरज शहरातील प्रमुख चौकात कार्यान्वित असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग या वाहनधारकांना ऑनलाइन दंडाचा दणका दिला आहे. त्यांच्याकडूनही दंड सक्तीने वसूल केला जाणार आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडे असलेल्या ‘ओएसओसी’ यंत्राद्वारे पुराव्यासह केलेल्या ऑनलाइन दंडाची ही वसुली होणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांना ऑनलाइन दंडाचा दणका दिला जातो. या दंडाची रक्कम कोट्यवधींच्या घरात गेली आहे. त्यामुळे याची वसुली वाहतूक नियंत्रक पोलिसांवर आली आहे. या मोहिमेत प्रत्येक वाहतूक पॉईंटवर दुचाकी, रिक्षा, मालवाहतूक रिक्षा, चारचाकी वाहने व अवजड वाहने तपासून त्यांच्याकडून प्रलंबित दंड वसूल करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोहिमेस सहकार्य करावे.

आपल्या वाहनांवर प्रलंबित दंड असल्यास वाहतूक नियत्रंण शाखेत अथवा ट्राफिक पॉईंटवर असलेल्या अंमलदारांकडे भरावा. तसेच या कालावधीमध्ये ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’, अल्पवयीन वाहनचालक, मोबाईल वापरणारे, ट्रिपल सीट याबाबतही कारवाई करण्यात येणार आहे. मिरजेतील व आसपास भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी प्रलंबित दंड भरून सहकार्य करावे व आपल्या रिक्षाची कागदपत्रे जवळ ठेवावीत. या कालावधीत जे वाहनचालक दंड भरणार नाहीत, त्यांना न्यायालयात पाठवून दंड वसूल केला जाईल, असा इशारा दिला आहे.

‘ओएसओसी’ यंत्राद्वारे ऑनलाइन दंड प्रणालीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑनलाइन दंडाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची तपासणी करून दंड वसूल केला जाणार आहे. दंडधारकांनी मिरज वाहतूक शाखा आणि वाहतूक पोलिसांकडे दंड भरून सहकार्य करावे.

- अनिल माने, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, मिरज

Web Title: Online Fines Police To Collect Outstanding

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..