ऑनलाईनद्वारे महावितरणच्या अभियंत्याची फसवणूक; गुन्हा दाखल

चंद्रकांत देवकते
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

मोहोळ : तुमच्या बँक खात्यावर बोनस गुण जमा करायचे आहेत. त्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डचे माहिती द्या, असे सांगत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याची व त्याच्या सहकाऱ्याची अशी मिळवून तीस हजार चारशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वामसी कृष्णा पेड्डीराजू हे लांबोटी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईट संपलेले आहेत. तुमच्या अकाउंटवर पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा नंबर व मोबाईलवर येणारा ओटीपी क्रंमाक मागितला. वामसी यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी नंबर सांगितला. मात्र, त्यांच्याजवळ क्रेडिट कार्ड नाही, असे सांगताच समोरच्या फोनवरील व्यक्तीने तुमच्या मित्राच्या क्रेडिट कार्डचा नंबर सांगा, असे सांगितल्यानंतर वामसी यांनी त्यांचे महावितरणमधील सहकारी नरेश गोपाळ कोंडा यांचा क्रेडिट कार्डचा नंबर सांगितला. त्यानंतर त्याचाही ओटीपी क्रमांक समोरच्या व्यक्तीने मागून घेतला.

प्रथम वामसी यांच्या खात्यामधून दहा हजार चारशे रुपयांची रक्कम ट्रान्सफर झाली तर कोंडा यांच्या डेबिट कार्डचे माहिती देतात. त्यांच्याही खात्यामधून वीस हजार रुपये अशी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. त्याबाबतचा एसएमएस आल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने ओटीपीच्या आधारे फसवणूक झाल्याचे वामसी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 23 नोव्हेंबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

Web Title: Online Fraud Affected MSEDC Engineer