उच्चशिक्षित तरुणीची ऑनलाइन फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

सोलापूर : स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेतून बोलतोय असे सांगून ओटीपी क्रमांक विचारून खात्यातून एक लाख रुपये ऑनलाइन काढून घेतले. दयानंद महाविद्यालयात पीएचडी करणाऱ्या तरुणीसोबत फसवणुकीची ही घटना घडली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

प्रतीक्षा संजय कुलकर्णी (वय 26, रा. युनायटेड विहार अपार्टमेंट, सोलापूर) यांनी ही फिर्याद दिली आहे. प्रतीक्षा या उच्चशिक्षित असून दयानंद महाविद्यालयात पीएचडी करत आहेत. त्यांचे वडील कळंब येथे कृषी विभागात अधिकारी आहेत. 19 डिसेंबरला प्रतीक्षा कुलकर्णी यांच्या मोबाईलवर फोन आला. स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेतून बोलतोय असे सांगितले. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, ते ऍक्‍टिव्हेट करण्यासाठी तुमच्या एटीएम कार्डवरील शेवटचे सहा अंक व एक्‍सपायरी डेट सांगा असे तो म्हणाला. ही माहिती घेतल्यानंतर त्याने मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारला. आणि त्याच दिवशी त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्याने एकूण एक लाख रुपये पेटीएमच्या माध्यमातून काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रतीक्षा यांच्या वडिलांनी बॅंकेत जाऊन खाते बंद केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप तपास करीत आहेत.

Web Title: online fraud with High-educated victim's