#Cybercrime : पैसे परत पाठवितो म्हणून काढून घेतले 51 हजार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

ड्रेस मटेरिअल पसंद न पडल्याने कस्टमर केअरला कळविले. त्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत करतो, असे सांगून मीनाक्षी यांचे पूर्ण नाव, बॅंकेचे नाव, खाते नंबर, यूपीआय नंबर मागवून घेतला.

सोलापूर : ऑनलाइन ड्रेस मटेरिअल खरेदी केले; परंतु ते पसंत पडले नाही. त्यामुळे ग्राहकाशी संपर्क साधला. यानंतर महिलेच्या बॅंक खात्यातून 51 हजार रुपये ऑनलाइन काढून घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी म्हणाला सर्वकाही ठीक होईल अन्‌ रात्री झाला अपघातात मृत्यू..!

मीनाक्षी राजशेखर लातुरे (वय 50, रा. तुळजापूर वेस, मंगळवार, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. मीनाक्षी यांनी 4 जानेवारी 2020 रोजी लाइम रोड ऍप सर्च करून ड्रेस मटेरियलची ऑर्डर दिली होती.

आकरावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या 

ड्रेसची डिलेव्हरी 6 जानेवारीला मिळाली. परंतु ड्रेस मटेरिअल पसंद न पडल्याने कस्टमर केअरला कळविले. त्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत करतो, असे सांगून मीनाक्षी यांचे पूर्ण नाव, बॅंकेचे नाव, खाते नंबर, यूपीआय नंबर मागवून घेतला. त्यानंतर संशयित आरोपीने मीनाक्षी यांच्या खात्यातून पेटीएमद्वारे थोडेथोडे करून 51 हजार रुपये काढून घेतले. यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online fraud news