ऑनलाईन प्राथमिक शिक्षक बदलीत घोटाळा 

तात्या लांडगे
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर - शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी यंदा प्रथमच जिल्ह्यांतर्गंत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने झाल्या. अनेक शिक्षक संघटनांकडून कौतुकही झाले. मात्र, बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या शिक्षकांच्या शोधानंतर या ऑनलाईन बदली प्रक्रियेतील घोळ आता बाहेर पडू लागला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी बदलीतील बोगसगिरीच्या चौकशीसाठी तालुकास्तरावर चौकशी समित्यांची नियुक्‍त केल्या आहेत. 

जिल्ह्यातील संवर्ग 1 व 2 मधील 5 हजार 900 शिक्षकांच्या बदल्या झाल्या. विनंती आणि प्रशासकीय बदल्यानंतर बहुतांशी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, बनावट माहितीच्या आधारे बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा डॉ. भारुड यांनी दिल्याने अनेक शिक्षक अस्वस्थ झाले आहेत. तर विस्थापितांना न्याय मिळेल अशी आशा आहे. बार्शी तालुक्‍यात सर्वाधिक गोंधळ असून, अन्य तालुक्‍यातील कमी-अधिक प्रमाणात शिक्षकांनी चुकीची माहिती भरली आहे. त्यामध्ये आजारी असल्याचे प्रमाणपत्र बोगस दाखविल्याच्याही तक्रारींचा समावेश आहे.

गुगल मॅपिंगद्वारे अंतर मोजणी 
संवर्ग 2 मधून बदलीसाठी अर्ज करताना पती-पत्नीच्या शाळेतील अंतर 30 किलोमीटरपेक्षा कमी असतानाही एसटी महामंडळाच्या दाखल्याचा आधार घेत ज्यादा अंतर दाखविण्यात आले. काहींनी तर एकाच केंद्रातील दोन शाळांमधील अंतर 50 किलोमीटरपेक्षा अधिक दाखविले आहे. संवर्ग 2 चा लाभ केवळ स्वजिल्ह्यातील पती-पत्नींच घेणे अपेक्षित आहे. परंतु, या बदली प्रक्रियेत अनेकांनी गैरफायदा घेतला असून, अर्ज भरताना दाखविलेल अंतर आत गुगल मॅपिंगद्वारे मोजले जाणार आहे. 

समितीद्वारे चौकशी सुरू 
सर्व तालुक्‍यांतील गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि गट शिक्षाधिकाऱ्यांमार्फत शिक्षक बदल्यासंदर्भातील तक्रारींची माहिती संकलित करण्यात येत आहे. प्राप्त तक्रारींनुसार सोमवारपर्यंत पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बोगस माहितीद्वारे बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांचा अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे देण्यात येईल. त्यानंतर संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. 
संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी

Web Title: Online Primary Teacher Transfer Scam