शिक्षकांच्‍या आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाइन प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सातारा - आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतीक्षेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया यावर्षीपासून सुरू झाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यांत बदलीसाठी कराव्या लागणाऱ्या कसरती आणि वशिला प्रकाराला यामुळे आता आळा बसणार आहे. 

सातारा - आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतीक्षेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया यावर्षीपासून सुरू झाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यांत बदलीसाठी कराव्या लागणाऱ्या कसरती आणि वशिला प्रकाराला यामुळे आता आळा बसणार आहे. 

आंतरजिल्हा शिक्षक बदलीबाबत ज्या त्या जिल्हा परिषदेच्या धर्तीवर विचार होत असल्याने अनेक शिक्षकांना परजिल्ह्यात काम करण्यावाचून पर्याय उरत नव्हता. आंतरजिल्हा बदली केवळ नावापुरतीच राहिली होती. या प्रक्रियेत बदल करीत शासनाने ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याबाबतचा अध्यादेश काढला जाणार असून, ही प्रक्रिया राबविली जाईल, असा अंदाज प्राथमिक शिक्षण विभागातून वर्तविला.

यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित शिक्षकास मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागत होते. समोरील जिल्ह्याच्या सीईओंनी होकार दिल्यास संबंधित शिक्षकांस रुजू करून घेतले जात असे. दोन्ही सीईओंचे ना हरकत प्रमाणपत्र घेताना शिक्षकांना अनेक कसरती कराव्या लागत होत्या. त्याशिवाय राजकीय वशिलाही वापरावा लागत असे. 

ग्रामविकास मंत्रालयाने आता या प्रक्रियेत बदल करीत संबंधित प्रक्रिया ऑनलाइन करण्यास गती दिली आहे. संबंधित शाळेच्या पोर्टलवर शिक्षकाची माहिती भरली जाईल. मुख्याध्यापकांनी ही माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवायची आहे. गटशिक्षणाधिकारी ही माहिती जिल्ह्याचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉग इनवर पाठवतील. जिल्ह्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून विभाग आणि राज्याच्या लॉग इनवर दिली जाणार आहे.

शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणानुसार आता शाळेची परिपूर्ण माहिती ही शालार्थ, सरल आणि संचमान्यता पोर्टल यावर भरण्यात आलेली आहे. या माहितीमुळे आता आंतरजिल्हा बदलीची प्रक्रियाही सोपी होणार आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी आता राज्यातून एकाच वेळेस ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार आहे. 

खुल्या वर्गास वेट ॲण्ड वॉच
दोन्ही सीईओंचा ना हरकत दाखला मिळाला आहे, अशा शिक्षकांना ता. आठ मेपर्यंत मुक्‍त करावे, असे शासनाने पत्र दिले आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या ८७, तर परजिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्या चार शिक्षकांना होणार आहे. हे सर्व एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या रोस्टरमध्ये खुल्या प्रवर्गातील शिक्षक अतिरिक्‍त असल्याने आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या खुल्या वर्गास वेट ॲण्ड वॉचची भूमिका घ्यावी लागेल.

Web Title: online process for teacher inter district transfer