कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकर भरती होणार ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कोल्हापूर - राज्य सरकारने जम्बो नोकर भरतीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेकडे असणारी रिक्‍त पदे, रोस्टर, नोकर भरतीची तयारी याबाबत गुरुवारी (ता. १३) ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन माहिती घेतली. येत्या चार दिवसांत याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आढावा घेतला. जिल्हा परिषदेकडून ६७२ पदांसाठी भरती केली जाणार आहे.

ग्राम विकास विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्‍त जागा, रोस्टर आदीची माहिती घेण्यासाठी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुखांचा समावेश होता. या वेळी काही जिल्ह्यांचे रोस्टरचे काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. अशा जिल्हा परिषदांना पुढील दोन दिवसांत रोस्टर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

साधारणपणे १५ डिसेंबरला जम्बो नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, एवढ्या कमी वेळात रोस्टर पूर्ण होणार नसल्याने किमान चार दिवस ही प्रक्रिया पुढे जाण्याची शक्‍यता आहे. ही जाहिरात १८ किंवा १९ डिसेंबरला प्रसिद्ध होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Online recruitment to Kolhapur Zilla Parishad