esakal | Belgaum Election 2021 - मतदार 'राजा' निरुत्साह; दुपारपर्यंत केवळ 33 टक्क्यांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Election 2021 - मतदार 'राजा' निरुत्साह

महापालिकेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सूरु असून, दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ 33 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

Belgaum Election 2021 - मतदार 'राजा' निरुत्साह

sakal_logo
By
महेश काशिद

बेळगाव : महापालिकेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सूरु असून, दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ 33 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. (Belgaum Election 2021) यामुळे मतदारांत निरुउत्साह दिसत असून, संथगतीने मतदान सुरु आहे. 4 लाख 30 हजार 825 मतदारांपैकी 1 लाख 45 हजार 15 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामध्ये 78, 129 पुरुष आणि 67, 786 महिलांचा समावेश आहे. (Blegaum Update)

हेही वाचा: बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा आवाज होणार बुलंद

बेळगाव महापालिकेसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.54 टक्के, सकाळी 11 पर्यंत 15.71 टक्के, दुपारी 1 पर्यत 25.76 टक्के आणि दुपारी 3 वाजेपर्यत 33 टक्के मतदान झाल्याचे निवडणुक विभागाने कळवले. (Belgaum News) यामुळे मतदारांमध्ये निवडणुकीबाबत निरउत्साह दिसला. सकाळच्या टप्प्यात मतदार बाहेर पडले नसल्याचे जाणवले. पण, दुपारनंतर मतदान वाढण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या १८ जागांसाठी ३८७ उमेदवार रिंगणामध्ये असल्यामुळे चांगलीच चुरस विविध प्रभागांमध्ये तयार झाली आहे. शिवाय या निवडणुकीत पहिल्यांदा इव्हीएम (EVM Machine) मशिनची मदत घेण्यात आली आहे. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले असून, पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. यामुळे राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची व महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी आव्हानात्मक निवडणूक ठरली आहे. त्यामुळे बेळगावसह महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.

हेही वाचा: ..अखेर शिक्षक भरतीचा मुहूर्त लागला ; 2062 जागांची यादी जाहीर

एक नजर

  • सकाळी 7 : 6.54 टक्के

  • सकाळी 11 : 15.71 टक्के

  • दुपारी 1 : 25.76 टक्के

  • दुपारी 3 : 33 टक्के

  • मतदान पुरुष : 78,129

  • महिला मतदान : 67,786

loading image
go to top