सौभाग्य योजनेअंतर्गत फक्त 665 लाभार्थी; वंचित कुटुुंब संतप्त

हुकूम मुलाणी  ​
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मंगळवेढा  : ग्रामीण भागातील दारिद्र्य खालील व दारिद्र्य रेषेवरील ज्या कुटुंबात वीज जोड देण्यासाठी 'प्रधानमंत्री सहज बिजली हर घर' योजनेच्या सौभाग्य अंतर्गत तालुक्यातील ठराव दिला आहे. या ठरावात 7259 यादीऐवजी सोयीच्या 665 लाभार्थ्यांनाच वीज जोडणी देवून बाकीच्या कुटुंबात जोड देण्याच्या बाबतीत महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे. वंचित कुटुंबाला अंधारात ठेवण्याचे काम केल्याने त्याच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामीण भागातील सर्व घरांना व अतिदुर्गम भागातील घरांना शिवाय शहरी भागातील सर्व घरांना की ज्या घरांमध्ये लाईट नाही अशा घरांना मार्च 19 पर्यंत या योजनेतून वीज जोडणी करण्याचे प्रास्तावित होते. त्याबाबतचे शासनाने परिपत्रक 2 नोव्हेंबर  2017 ला पारित केले होते. त्यानुसार ग्रामीण भागातील वीज नसलेल्या कुटुंबाची माहिती, कुटुंबाचा घर क्रमांक दारिद्ररेषा यादीत आहे किंवा नाही? वीज पुरवठा देण्यासाठी जवळची वाहिनी उपलब्ध आहे का ? आदी माहिती देण्याच्या सूचना या परिपत्रकानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतीला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण भागातील या वंचित कुटुंबाचा ग्रामपंचायत सर्वे करून ग्रामसभेतून 78 ग्रामपंचायतची निश्चित केलेली 7259 कुटंबाची माहिती पंचायत समितीला सादर करण्यात आली होती. पंचायत माध्यमातून वंचिताची माहिती महावितरणच्या कार्यालयात देण्यात आली परंतु यादीची पडताळणी न करता मनमानी पध्दतीने त्याना सोयीचे होतील अशा कुटुंबाला वीज जोड दिली.

पंचायत समितीने दिलेली यादीचा विचार करणे टाळले. या यादीऐवजी त्यांच्या कर्मचाऱ्याकडून यादी करून 665 आसपास कुटुंबाला वीज जोडणी केली.  बाकीच्या कुटुंबाला आंधारात ठेवण्याचा अन्याय महावितरण कंपनीने केला. त्यामुळे शासनाच्या महत्वाच्या योजनेपासून या कुटूंबाला आंधारासह वंचित राहावे लागत आहे.

''गावठाणात असलेल्या कुटुंबाला वीज जोड दिली असून वाडी वस्तीवरील कुटुंबाला वीज जोड दिली नाही.वरिष्ठाकडून त्याना वीज देण्याच्या सुचना मिळताच त्यानाही वीज जोड दिली जाईल.''
- नारायण होनमाने, कार्यकारी, अभियंता महावितरण 

''निवडक आणि सोयीच्या कुटुंबाला वीज जोड द्यायची असेल पंचायत समितीकडून यादीची मागणी करायचीच कशाला ?ग्रामसभेने मान्यता दिलेल्या पंचायत समितीकडून दिलेल्या यादीतील सर्वच कुटूंबाला वीजजोड द्यावी अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.''
- प्रदीप खांडेकर, सभापती

Web Title: Only 665 beneficiaries under saubhagya scheme ; Deprived family angry