केवळ नववी शिकलेल्या गर्भतपासणी करणाऱ्या युवकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग चाचणी
करत असल्याप्रकरणी केवळ नववी शिकलेल्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण
विभागाने (एलसीबी) अटक केली आहे.

 

सातारा - पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग चाचणी
करत असल्याप्रकरणी केवळ नववी शिकलेल्या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण
विभागाने (एलसीबी) अटक केली आहे.

नाथा सहदेव खाडे (वय 31, रा. धामणी, ता. माण) असे त्या युवकाचे नाव आहे.
बेकायदेशीर गर्भलींग निदान करणाऱ्या जिल्ह्यातील रॅकेटवर
लक्ष ठेवण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार एलसीबीचे पथक अशा व्यक्तींच्या शोधात होते.

आज पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना एक व्यक्ती दुचाकीवरून  बॅगमध्ये सोनाग्राफी मशीन घेऊन खटाव तालुक्‍यात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी कळंबी (ता. खटाव) येथे सापळला लावला. त्यामध्ये नाथाला पकडण्यात आले. त्याच्याकडे सोनास्टार कंपनीचे सोनोग्राफी मशीन आढळून आले. या मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग परिक्षण करत असल्याची कबूली त्याने पोलिसांजवळ दिली. तसेच, त्याचे केवळ नववी पर्यंत शिक्षण झाले असल्याचेही त्याने
पोलिसांना सांगितले.

त्याच्याकडून सोनोग्राफीमशीन, दुचाकी, मोबाईल असा सुमारे दोन लाख 26 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेकायदेशीर गर्भलींग निदान करणाऱ्या व्यक्तींची माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, स्थानिक पोलिस ठाणे किंवा 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक घनवट यांनी केले आहे. उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, रवी वाघमारे, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, मोनाली निकम, प्रवीण कडव, गणेश कचरे, मारूती आडागळे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Only ninth class learning youth arrested with sonography machine in satara