कऱ्हाड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे छापे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छुप्या व काही ठिकाणी खुले आम चालणाऱ्या गुटखा विक्रीच्या विरोधात अन्न औषध प्रशासनाने महिनाभरात चांगली कार्यवाही केली आहे.

कऱ्हाड - जिल्ह्यात महिनाभरात सतरा ठिकाणी छापे टाकून अन्न व औषध प्रशासनाने सुमारे सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त केला. सतरापैकी पंधरा ठिकाणच्या दुकानांना तर दोन वाहनांना खात्याने सील लावला आहे. गुटख्यासह परराज्यातून येणारा पान मसाल्याचाही त्यात समावेश आहे. 

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी छुप्या व काही ठिकाणी खुले आम चालणाऱ्या गुटखा विक्रीच्या विरोधात अन्न औषध प्रशासनाने महिनाभरात चांगली कार्यवाही केली आहे. पानपट्टी किंवा घराचा आसरा घेवून जिल्ह्यातील मोठ्या गावामध्ये गुटखा विक्री होत होती. शहरी भागात त्या गुटखा विक्रीने खुलेआम स्वरूप धारण केले होते. त्यामुळे त्यावर कारावाईची मागणी होत होती. विविध स्तरासह शासन पातळीवरूनही गुटखा बंदीचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळे त्या विरोधात कारवाईचा आराखडा आखला. त्यानुसार कारवाईचा सपाटा लावला. अवघ्या महिनाभरात अन्न औषध प्रशासानाने दोन लाखांचा गुटखा व पान मसाला छापा टाकून बेधडक कारवाई सुरू केली. कारवाई करताना थेट दुकान व पान शाॅप थेट सील करण्याची कारवाई केली.

Web Title: ood and Drug Administration raids in Karhad district