" या ' महापालिकेतील तिसरा डोळा "उघडा' ; 766 गैरप्रकार आले "नजरेत' 

" या ' महापालिकेतील तिसरा डोळा "उघडा' ; 766 गैरप्रकार आले "नजरेत' 


सोलापूर ः महापालिकेच्या विविध कार्यालयांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गेल्या पाच वर्षांत तब्बल 766 गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यामध्ये चोरी, गैरहजेरी, फायली गायब होणे, पालिकेच्या इमारतीमध्ये घाण करणे आदी घटनांचा समावेश आहे. 

नियंत्रण आयुक्त कार्यालयात

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या महापालिकेच्या इमारतीमध्ये 2013-14 मध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. इंद्रभुवन, प्रशासकीय इमारत आणि कौन्सिल हॉलमधील विविध कार्यालयात हे कॅमेरे आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयातील हालचाली टिपल्या जातात. त्याचे संपूर्ण नियंत्रण आयुक्तांचे वैयक्तिक कक्ष तसेच उपायुक्तांच्या कार्यालयात आहे. या सर्व कार्यालयात काय सुरू आहे, त्याची इत्थंभूत माहिती या दोन्ही कार्यालयांत उपलब्ध होते. याशिवाय, विविध विभागीय कार्यालयांत लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यातूनही तेथील घडामोडी आयुक्त कार्यालयात बसल्याजागी पाहायला मिळत आहेत. 

फायलींची चोरी आणि कर्मचाऱ्यांची गैरहजेरी

महापालिकेच्या काही कार्यालयामध्ये चोरी, फायली गायब होणे असे प्रकार झाले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची गैरहजेरी दिसून आली. त्यामुळे कोणता कर्मचारी कधी आला, कार्यालयात किती वेळ बसला याचीही माहिती होऊ लागल्याने संबंधितांवर कारवाईही झाली. महापालिकेतील काही मुख्य घटना आणि गैरप्रकारांबाबत या सीसीटीव्ही फुटेजचा पोलिस विभागासाठी फार उपयोग झाला. विशेषतः मध्यंतरी मिळकतकराची बनावट पावती तयार करणे, अभिप्राय दिलेली फाईल गायब होणे हे प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आले. त्यामुळे दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाईही झाली.

म्हणून झाला बुलेट कॅमेरा लावण्याचा निर्णय

उड्डाण पुलासंदर्भात सभागृहात चर्चा झाली असताना महत्त्वाच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. ड्डाणपुलासंदर्भातील मांडलेली उपसूचना आणि झालेला गोंधळ याचे चित्रीकरणही गायब झाले होते. त्यानंतर सभागृहात उच्च क्षमतेचे कॅमेरे बसविण्याचा निर्णय झाला, मात्र अद्याप त्याची कार्यवाही झाली नाही. हे कॅमेरे बसविले तर सभागृहात होणाऱ्या गोंधळाचे चित्रीकरण होऊ शकते आणि गोंधळ घालणाऱ्यांवर त्याबाबत कारवाई करणे सोपे होते. 

असे आले प्रकार उघडकीस 
- फायलींची चोरी होणे ः 98 
- कार्यालय परिसरात घाण करणे ः 182 
- फायली गहाळ होणे ः 142 
- कर्मचाऱ्यांची गैरहजेरी ः 278 
- नागरिकांचे गैरवर्तन ः 66 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com