रासायनिक रंगांची खुलेआम विक्री

अमृता जोशी
गुरुवार, 16 मार्च 2017

कोल्हापूर - पर्यावरणपूरक पद्धतीने रंगपंचमी साजरी व्हावी, यासाठी निसर्गप्रेमी, शासन, जागरूक मंडळींतर्फे प्रतिवर्षी जनजागृती केली जाते. तरीही रंगपंचमीला वापरले जाणारे रासायनिक रंग सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे. रासायनिक रंग त्वचा, डोळे, श्‍वसनसंस्था, मूत्रपिंडासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येते. तरीही याचा काहीही परिणाम न होता रासायनिक रंग बाजारपेठेत खुलेआम विकले जात आहेत.

नैसर्गिक रंगांच्या तुलनेत ते स्वस्त असल्याने तसेच, व्यापाऱ्यांनाही फायदा असल्याने या रंगांची उपलब्धता असते. भरीस भर म्हणून ‘केवळ औद्योगिक वापरासाठी’ असलेले रंग बाजारात आले आहेत. रंगांच्या वेष्टनावर ‘फॉर इंडस्ट्रियल युज ओन्ली’ असे धडधडीत लिहिले असतानाही त्याची खुलेआम विक्री होत आहे. लोखंड, लाकूड, मशिनरी यांना देण्यात येणारे हे रंग आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रार देऊनही अन्न व औषध प्रशासनाने हरकत घेतलेली नाही. याला माहितीचा अभाव म्हणावे की दुर्लक्ष की गाढ झोप? इतक्‍या गंभीर विषयावर कारवाई न होता शहरात स्टॉल्स, हातगाड्या, दुकानांमध्ये खुलेआम विक्री होत आहे. मुलांच्या हौसेखातर पालकही रंग विकत घेत आहेत. रंगपंचमी तोंडावर आलेली असताना आता तरी किमान याबद्दल जागरूक व्हावे, असे आवाहन निसर्गप्रेमी संघटनांकडून होत आहे.

चायना नाही देशी मेडच
दिवाळी, गणेशोत्सवात ‘चायना मेड’ माळा, आकाशकंदील, सजावटीच्या साहित्यावर नागरिकांनी बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता रंगपंचमीसाठी चायना पिचकाऱ्या, रंगांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पिचकाऱ्यांच्या आयातीमुळे देशाचे परकीय चलन चीनकडे जात आहे. भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांच्या वापरामुळे देशातील कारागिरांना रोजगार मिळेल. भारतीय चलनाचे अवमूल्यन होणेही कमी होईल. देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी पुन्हा एकदा चायना मेड वस्तूवर बहिष्काराचे आवाहन करण्यात येत आहे.

‘खडी कलर’मध्ये ॲसिड, अल्कली, काचेची भुकटी असते. रंगांची ‘बॅक्‍टेरिया टेस्ट’ही केलेली नसते. रंग डोळ्यांत गेल्यास बुबुळाचा काही भाग जळून जाणे, पांढरे पडणे, जंतुसंसर्ग होण्याचे दरवर्षी १५-२० रुग्ण आढळतात. ग्रीस लावणे, फुगे मारणे असेही प्रकार करतात. यामुळेही इजा होते. पाण्याचा फुगा दगडाइतकाही जोरात लागू शकतो. याबाबतही निष्काळजीपणा आढळतो.
- डॉ. सतीश शितोळे, एम. एस. (नेत्ररोग)

Web Title: Openly selling chemical colors