वस्त्रोद्योगाला सौदी अरबमध्ये प्रवेशाची संधी (Video)

garment
garment

सोलापूर : मध्य पूर्वेतील सौदी अरब हा देश गारमेंट उत्पादनांचा मोठा ग्राहक असून, तुर्कीतून सौदी अरबला मोठ्या प्रमाणात गारमेंट उत्पादने निर्यात होतात. मात्र, तुर्की व सौदी अरब या दोन्ही देशांदरम्यान सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी दोन्ही देशांच्या व्यापारावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. आता हीच संधी आहे, भारतीय वस्त्रोद्योगाला सौदी अरबमध्ये प्रवेश करण्याची. त्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न व्हायला हवेत. 
सोलापुरातून सौदीला हलक्‍या व चांगल्या दर्जाचे टॉवेल निर्यात केले जातात. तरी सोलापूरच्या वस्त्रोद्योगालाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा घेता येणार असून, विशेषत: गारमेंट उत्पादकांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून तुर्कीला पर्याय ठरल्यास भविष्यात सौदी अरबला गारमेंट पुरवठादार म्हणून सोलापूरची वेगळी ओळख निर्माण होईल. त्यासाठी तेथील भारतीय दूतावासाची मदत घेता येईल. मार्केटिंगसाठी एकट्याने न जाता दहा-बारा उत्पादकांच्या टीमने सौदी अरबचा दौरा केल्यास व तेथील निदान 20 टक्के ऑर्डरी मिळवल्या तरी सोलापुरातील गारमेंट उद्योगाला कायमस्वरूपी मुबलक कामे मिळू शकतील. 

  • सौदीमध्ये आहेत मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम कंपन्या 
  • कंपन्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांना लागतो युनिफॉर्म 
  • पेट्रोल रिफाइन्ड युनिटमध्ये युनिफॉर्म लगेच होतात खराब 
  • कंपन्यांच्या मापदंडानुसार एकच युनिफॉर्म जास्त दिवस वापरता येत नाही 
  • नागरिकही प्रखर तापमानामुळे कपडे जास्त दिवस वापरत नाहीत 
  • हजला जाणाऱ्या भाविकांना जानमाज आदी प्रकारचे टॉवेल लागतात 

उत्पादने पाहण्यासाठी येणार नाहीत अरेबियन तुमच्याकडे 
तुर्कीशी संबंध बिघडल्यानंतर आता सौदीला मोरोक्को, चीन, बांगलादेश, व्हिएतनाम आदी देश वस्त्र पुरवण्यासाठी पुढाकार घेतील. जो प्रथम जाईल त्याला संधी मिळेल. त्यांना वस्त्रांची गरज आहे मात्र ते स्वत: तुमच्याकडे येऊन मागणी करणार नाहीत. जो उत्पादने घेऊन जाईल त्यांची उत्पादने ते घेतील. दर्जा चांगला असेल तर किमतीत घासाघीस करणार नाहीत. त्यासाठी उत्पादकांनी स्वतंत्र एकटा न जाता 10-12 जणांची टीम करून भेट द्यायला हवी. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्याचा निरोप अण्णांपर्यंत पोचविला 
मिडल ईस्टचे अनुभव संमिश्र 

ही एक चांगली संधी आहे. इतर देश सौदीला पोचून याचा लाभ घेण्याअगोदर आपण पोचले पाहिजे. कारण तेथे भारतीयांची संख्या जास्त आहे. आपल्या उत्पादनांना चांगली संधी असते. तेथे लक्ष केंद्रित करावे लागेल. मात्र, मिडल ईस्ट देशांना उत्पादने पाठवताना पेमेंट टर्म जे असतात तेथे काळजी घ्यावी लागेल. कारण मिडल ईस्टचे अनुभव संमिश्र आहेत. दगाफटका होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी लागते. 
- राजेश गोसकी, अध्यक्ष, टेक्‍स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन 

कॉटन वस्त्रांच्या दर्जाबाबतीत तुर्कीनंतर भारताचा क्रमांक लागतो. आता सौदी अरबकडे युनिफॉर्म, गारमेंटची बाजारपेठ म्हणून लक्ष केंद्रित करावे लागेल. नुकतेच "सकाळ'च्या वर्धापनदिनानिमित्त सौदी अरबचे 20वे भारतीय राजदूत अहमद जावेद सोलापूरला आले असता, त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यांनी याबाबतीत मार्गदर्शन करून शक्‍य असतील ते प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
- रोहन बंकापुरे, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com