लक्ष्मण मानेंच्या वक्तव्याचा मराठा समाजाकडून समाचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

सातारा : 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी रविवारी (ता. 9) केलेल्या वक्तव्याचा आज (साेमवार) सकल मराठा समाजाने साताऱ्यात समाचार घेतला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देत माने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजातील युवतींनी केली. 

पाटलांच्या पोरींना मी लावणी शिकवतो, त्यांनीही नाचले पाहिजे, असे वक्तव्य "उपरा'कार लक्ष्मण माने यांनी रविवारी (ता. 9) पुण्यात एका परिषदेत केली. या वक्तव्याचा सकल मराठा समाजाने अाज (साेमवार) साताऱ्यात समाचार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर मराठा समाजातील युवतींनी मानेंच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा निषेध केला. त्यानंतर सकल मराठा समाजाने सिंघल यांना निवेदन देत माने यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली.

Web Title: oppose to Laxman mane for his statement by Maratha Community