श्रीगोंदे घनकचरा प्रकल्पाला विरोध, काळे झेंडे आणि नागरीकांची घोषणाबाजी 

संजय आ. काटे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

श्रीगोंदे (नगर) : पालिका पावणेतीन कोटी खर्चाचा अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या भिंगाण परिसरात उभारला आहे. पहिला कचरा डेपो हटविण्याची मागणी तेथे होत असल्याने या प्रकल्पाला विरोध करीत नागरीकांनी प्रकल्पाचे भुमिपुजन होण्यापुर्वीच हातात काळे झेंडे आणि पालिकेविरोधात घोषणाबाजी सुरु केल्याने सत्ताधारी कार्यक्रमासाठी तिकडे फिरकलेच नाहीत. 

आंदोलक पालिकेत आले व तेथे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांना निवदेन देत या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. यावेळी हरिभाऊ शिंदे, नीतीन रायकर, संतोष रायकर, पल्लवी रायकर, जयश्री रायकर आदी उपस्थितीत होते. 

कचरा डेपोने आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका त्याकडे दुर्लक्ष करते. वारंवार आंदोलने केल्यावरही उपयोग झाला नाही. हा प्रश्न निकाली काढण्याऐवजी पालिका आमच्या जखमांवर मीठ चोळत असल्याने आम्ही प्रकल्प होवू देणार नाही. 
- हरिभाऊ शिंदे

आज त्या भागात काही अडचणी असल्या तरी हा प्रकल्प झाल्यावर त्या परिसरात कुठलीही समस्या राहणार नाहीत. लवकरच हा प्रकल्प सुरु होणार असून अद्यायावत पध्दतीने कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याने नागरीकांनी सहकार्य करावे. 
- मनोहर पोटे, नगराध्यक्ष श्रीगोंदे नगरपालीका.

Web Title: Opposition to Shrigonda Ghanchakra Project