नऊ कारखान्यांवर उत्पादन बंदीचे आदेश 

परशुराम कोकणे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरातील नऊ उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे यांनी दिली. 

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापुरातील नऊ उद्योगांना उत्पादन बंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे यांनी दिली. 

उत्पादन बंदीचे आदेश दिलेल्या उद्योगात महेश पॉलिमर, आनंद प्लास्टिक, श्री स्वामी समर्थ प्लास्टिक, सदानंद प्लास्टिक, तहा इंडस्ट्रीज, बालाजी फ्लेक्‍स अँड पॅकेजिंग, सिद्धेश्‍वर प्लास्टिक इंडस्ट्रीज, सुनील इंडस्ट्रीज, देवकीनंदन इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. या उद्योगाचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. 

पुनर्चक्रन होणारे मल्टिलेयर पॅकेजिंग व प्लास्टिकचा एक स्तर असलेला पुठ्ठा किंवा पेपर आधारित खोका उत्पादकांनी पर्यावरणसंबंधी उत्पादक दायित्व योजनेअंतर्गत (ईपीआर) प्लास्टिकच्या विल्हेवाटीसाठी रॅग पिकर्स, स्क्रॅप ट्रेडर्स, किरकोळ विक्रेता यांच्याशी समन्वय साधून प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेची जबाबदारी जबाबदारी घेतली नाही. महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी अधिसूचनेनुसार ईपीआर नियमांचे उल्लंघन केल्याने नऊ उद्योगांना बंदीचे आदेश दिल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे यांनी सांगितले. 

महेश पॉलिमरसह नऊ उद्योगांनी प्लास्टिक बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. वेळोवेळी सांगूनही त्यांनी ईपीआर सादर केले नाही. उत्पादन दायित्व योजनेअंतर्गत प्लास्टिकच्या विल्हेवाटीसाठी उपाययोजना केल्या नाहीत. पुनर्प्रक्रियेची जबाबदारी टाळली आहे. 
- नवनाथ आवताडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Web Title: order to ban production to 9 factories