कराड शहरात बसवण्यात येणार ऑर्गेनिक कर्न्व्हटर

कराड शहरात बसवण्यात येणार ऑर्गेनिक कर्न्व्हटर

कऱ्हाड- कचऱ्यावर प्रक्रिया होवून त्याचे दररोज एक टन खत निर्माण करण्यासाठी शहरातील सहा ठिकाणी ऑर्गेनिक कर्न्व्हटर बसवण्यात येणार आहे. शहरी भागात प्रथमच अशा प्रयोग होतो आहे. एका ठिकाणास दहा लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून त्याची तरतूद करण्यात आली आहे. सहाही ठिकाणच्या प्रकल्पांचा अंदाजित खर्च 70 लाख 28 हजार अपेक्षित आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानातंर्गत पालिकेने अत्यंत महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शहरातून दररोज किमान 32 टनाचा कचरा जमा होता. त्यातली 16 टनाचा कचरा ओला व तितकाच सुका कचरा आहे. ओला कचऱ्यावर प्रक्रीया करणारा प्रकल्प पालिकेने यापूर्वीच सुरू केला आहे. मात्र सुका कचऱ्यावरील प्रकल्प अद्यापही सुरू नाही. ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून पालिकेने पाच टनाचा बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे. त्या माध्यमातून वीज निर्मीती केली जाते.

कचरा डेपो परिसरात जेवढ्या ट्युब आहेत. त्या याच वीज निर्मितीवर चालतात. येथे पालिका स्वयंपूर्ण झाल्याचे दिसते. त्याशिवाय अकरा टन क्षमतेचे 26 कंपोस्ट पीटद्वारे सेंद्रीय खतही निर्मिती केली जात आहे. दोन्ही प्रकल्प एकाच ठिकाणी आहेत. शहरातील सगळा कचरा एकाच ठिकाणी येतो. तेथेच त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे येथील यंत्रणेवर भार येताना दिसतो आहे. त्यामुळे शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या विकेंद्रीकरण करण्यासाठी पालिका प्रयत्न करताना दिसते. त्याचा एक भाग म्हणून शहरातील सहा वेगवगेळ्या ठिकाणी ऑर्गेनिक कर्न्व्हटर बसवण्यात येणार आहेत.

शहरातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येक एका ठिकाणी पाच टन क्षमेतेचे ऑर्गेनिक कर्न्व्हटर बसवण्यात येणार आहेत. त्या सहा ठिकाणांसाठी अंदाजे 70 लाख 28 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. पालिकेने ऑक्सीडेशन पॉण्ड येथे ज्या पद्धतीने कंपोस्ट पीट मधून तयार केलेले खत क्रश करण्यासाठी ग्रॅडर व स्क्रीनींग मशीन बसवले आहे. त्याच पद्दतीचे कार्वे नाका येथील पाण्याच्या टाकीजवळ व स्मशानभूमी येथे कंपोस्ट पीटसाठी तशी मशीन बसवण्यात येणार आहे. ऑर्गेनिक कर्न्व्हटरसाठी लागणारे साहित्य करेदी करण्यासाठी पालिकेने मंजूरी दिली आहे. त्यात ऑर्गेनिक कर्न्व्हटरसह निर्माल्य कलश, ग्रॅडर व स्क्रीनींग मशीन याचा समावेश आहे. त्यासाठी सहा ठिकाणी लागणाऱ्या मुलभूत सुविधांनाही त्याच खर्चास मंजूरी आहे. 


येथे बसणार ऑर्गेनिक कर्न्व्हटर
मंगळवार पेठेतील स्मशान भूमी परिसर
शिवाजी हौसींग सोसायटीतील एन आकाराचा बगीचा
पालिकेच्या शाळा क्रमांक सात व बारा 
वाखाण भागातील पालिकेची मोकळी जागा 
बारा डबरी परिसरातील पंपीग स्टेशन क्रमांक एक 
प्रीतिसंगम बागेतील निर्माल्य कलश ठेवण्याची जागा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com