'राष्ट्रवादीची'ची संघटनात्मक जोरदार बांधणी

दावल इनामदार 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

ब्रह्मपुरी (सोलापूर) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आतापासूनच तयारी सुरु झाली असून, पक्षाने प्रलंबित असलेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवडीवर भर दिला आहे. मंगलवेढा तालुका राष्ट्रवादी पक्षाला मानणारा मतदारसंघ असून, तालुक्याने माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राम साळे यांना मताधिक्य देऊन निवडून आणले होते. परंतु, २००९ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील बुरुज ढासळल्याने राष्ट्रवादी पीछेहाट झाली होती. 

त्यानंतर पक्षाने नगरपालिका व ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण केले गेले. सध्या आमदार भारत भालके कांग्रेस पक्षाचे असले तरी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यना विश्वासात घेऊन निवडणूक लढविली होती व आपल्या गटाचे शहरी, ग्रामीण भागात जाळे निर्माण केले आहे. 

राष्ट्रवादी पक्ष संघटनेने शहर व तालुक्यातील महिला, युवक, ओबीसी सेल यासह विविध पदाधिकारयांच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्याचे ताळमेळ करुन निवङी केल्या आहेत. तरी राष्ट्रवादी पक्षामधे धुसफूस आहे. त्यामुळे नव्या पदाधिकारयांच्या निवड़ीमुळे कार्यकर्त्यना उत्साहाचे वातावरण असले, तरी स्थानिक नेत्यातील गटास विश्वासात घेतले नसल्यामुळे राष्ट्रवादी पक्षास विधानसभा निवडणुकीस फटका बसण्याची चिन्हे दिसत आहे. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी असला, तरी येथील जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यानी मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा माननीय खासदार शरद पवारांची भेठ घेऊन नवीन युवकांना संधी देउन ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक कामे करावी असे मोलाचे सल्ले दिले. आतापासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा संदेश दिला आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. 

मंगलवेढा नगरपालिका राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात असून, कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणून अनेक कामे प्रगती पथावर आहे. तसेच ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक कामे चांगली असून, विविध मोर्चे, रस्ता रोखो अशा आंदोलनात पक्षाची कामे आहेत. राष्ट्रवादीच्या शहा गटास शहरी व ग्रामीण भागात मानणारा वर्ग आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे संदेश दिले आहेत. 

सध्या आमदार भारत भालके कांग्रेस पक्षाचे असलेतरी पक्षाची संघटनात्मक धोरणे, कार्यक्रत्याच्या निवड़ी, मोर्चे, नविन-जुन्या कार्यकर्त्यांच्या फळीचा समन्वय नसल्यामुळे कांग्रेस पक्ष विस्कळीत झाला आहे. त्यामुळे भालके गटाला निवडणुकीत कांग्रेस पक्ष सक्षम असला, तरी राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिल्यास व इतर पक्षाची गटातटाची डोकेदुखी वाढणार आहे.

Web Title: Organized strongly for 'NCP's'