मंगळवेढ्यात महसूल खात्याकडून विविध दाखल्यासाठी शिबिराचे आयोजन

हुकूम मुलाणी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : तालुक्यातील नाथपंथीय डवरी गोसावी समाजातील नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी महसूल खात्याने मंडल स्थरावर मेळावे घ्यावेत असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले.

मंगळवेढा : तालुक्यातील नाथपंथीय डवरी गोसावी समाजातील नागरिकांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी महसूल खात्याने मंडल स्थरावर मेळावे घ्यावेत असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले.

नाथपंथी डवरी समाजातील पाच जणांनी पोटाची खळगी भरण्यासाठी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे हत्या झाली. त्यानंतर मृताचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डाॅ राजेंन्द्र भोसले यांच्यासमोर या समाजाचे महसूल खात्याकडून विविध दाखल्यासाठी होत असलेल्या अडवणूकीबाबतचे प्रश्न मांडले असता त्यांनी याबाबत तोडगा काढण्याबाबत लेखी पत्र भालकेच्या समोर दिले. त्यानुसार तहसील कार्यालयात या समाजातील महसूल खात्याकडून लागणाय्रा विविध दाखल्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार भारत भालके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तहसीलदार आप्पासाहेब समींदर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, विधानसभा अध्यक्ष  नितीन नागणे, मच्छिंद्र भोसले, दादाराव भोसले, महसूल कर्मचारी आणि नाथपंथीय डवरी गोसावी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात जातीचे दाखले 275, उत्पन्न दाखले 35, शिधापत्रिका 60, इतके अर्ज आले. यामधील काही दाखले तात्काळ जागेवर देण्यात आले. यावेळी बोलताना आमदार भालके म्हणाले की, पारधी समाजासाठी शासनाने आराखडा करून निधीची तरतूद केली त्याप्रमाणे नाथपंथी डवरी समाजातील कुटुंबाच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा करून निधीची तरतुद करावी अशी मागणी विधानसभेत केली आहे.

Web Title: Organizing a camp for various certificates from the Revenue Department in mangalwedha