श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

राजशेखर चौधरी
गुरुवार, 12 जुलै 2018

अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे.

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा आणि ३१ वा वर्धापन दिनानिमित्त ता. १७ ते २६ जुलै या कालावधीत अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे.

यंदाच्या या कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर, गायिका उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, डॉ सलील कुलकर्णी, श्रीधर फडके, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संदीप पाठक, निवृत्ती महाराज इंदोरीकर आदींसह अनेक दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे. दररोज सायंकाळी ४ ते १२ अशा तीन टप्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार ता. १७ जुलै ला सायंकाळी ६.३० वाजता सोलापूर महापौर शोभाताई बनशेट्टी, राजेश परदेशी, यतीन शहा, विजय कानेटकर, अॅड. प्रदीपसिंग रजपूत आदींच्या उपस्थितीत होणार आहे. याचबरोबर अन्नछत्र मंडळाचा दरवर्षीप्रमाणे मुख्य धार्मिक कार्यक्रम शुक्रवार ता. २७ जुलै ला सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण व श्री गुरुपूजा, सकाळी ११ वाजता महानैवेद्य दाखविणे असा आहे. यावेळी अर्थतज्ञ विद्याधर अनास्कर, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, पार्श्वगायिका वैशाली सामंत, विनायक टनवे, दीपक बुगडे उपस्थित राहणार आहेत.त्यादिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महाप्रसाद तर सायंकाळी ४ वाजता स्वप्नील जोशी, बाळासाहेब धाबेकर, अतुल बेहरे यांच्या हस्ते तर ' नादब्रम्ह ' पुणेच्या ढोल पथकासह पालखी मिरवणूक शोभेच्या दारूकामाच्या आतषबाजीत शहराच्या मुख्य मार्गावरून काढली जाणार आहे. याचदरम्यान ता. २५ ते २७ जुलै या तीन दिवसात महारक्तदान शिबिराचे नियोजन केले गेले आहे. या पत्रकार परिषदेस प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले, सचिव शाम मोरे,उपाध्यक्ष अभय खोबरे, रविंद्र भंडारे, डॉ.मनोहर मोरे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, अलकाताई भोसले, अनिता खोबरे या विश्वस्तांसाह जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर यांची उपस्थिती होती.

अन्नछत्र मंडळातील ता. १७ जुलै ते २६ जुलै या कालावधीतील तीन टप्यातील विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत
डॉ.कमल ठकार यांचे प्रवचन तर  सत्संग महिला भजन मंडळ, विठाई भजनी मंडळ कल्याण, सरस्वती भजनी मंडळ अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, आषाढी वारी भजनी मंडळ राजगुरूनगर, जिव्हेश्वर भजन मंडळ अक्कलकोट, सुमित महिला भजनी मंडळ मुंबई, बाल गणेश आरती मंडळ गोवा आदि सर्व मंडळाचे भाजनसेवा तर ह. भ. प. रत्नप्रभा सहस्त्रबुद्धे यांची प्रवचन सेवा सादर होणार आहे.

दररोज सायंकाळी ७ ते ९.३० या वेळेत 
पंडित हृदयनाथ मंगेशकर : नक्षत्राचे देणे, उषा मंगेशकर : रंग उषेचे, संदीप पाठक : वर्हाड निघालाय लंडनला, श्रीधर फडके : बाबूजींची गाणी, डॉ.सलील कुलकर्णी : आयुष्यावर बोलू काही, ह भ प निवृत्त महाराज इंदोरीकर : कीर्तन, अनुराधा पौडवाल : भाव भक्तिगीते, संजय नार्वेकर आणि सहकलाकार : सर्किट हाऊस, संकृती बालगुडे : भक्तीरंग, संदीप पाटील आणि सहकलाकार : दिलसे मिले दिल

दररोज रात्री १० ते १२ या वेळेत
प्रभाकर निलेगावकर : अस्सल माणस 
इरसाल  नमुने, भारत जाधव : पुन्हा सही रे सही, भार्गवी चिरमुले : आमचं होत प्रकरण , सुनील सुतार : मधुर स्वरांगण, डॉ.गौरी दामले : जून ते सोन, मकरंद अनासपुरे : उलट सुलट, निपाणी : सुरभक्तीचे उमटले

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organizing Dharmasankirna and Cultural Programs in Shri Swami Samarth Akkalkot