लोकनेते साखर कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ सभासदांसाठी तीर्थयात्रेचे आयोजन

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 3 मे 2018

अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ सभासदांना कारखान्याच्या वतीने आजमेर दर्गा व काशी विश्वेश्वर यात्रेचे मोफत आयोजन केले असून, येत्या ९ मेला २०० सभासदांना या यात्रेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत राजन पाटील यांनी दिली.

मोहोळ : अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याच्या वतीने ज्येष्ठ सभासदांना कारखान्याच्या वतीने आजमेर दर्गा व काशी विश्वेश्वर यात्रेचे मोफत आयोजन केले असून, येत्या ९ मेला २०० सभासदांना या यात्रेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत राजन पाटील यांनी दिली.

लोकनेते साखर कारखान्याच्या वतीने प्रत्येक वर्षी सभासदांसाठी  विविध सामाजिक योजना राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून लोकनेते बाबूराव पाटील कारखान्याच्या वतीने यावर्षी कारखान्याच्या ज्येष्ठ सभासदांना या तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, ९ मे रोजी १०० सभासद आजमेर हजयात्रेसाठी व २० मे रोजी १०० सभासदांना काशी विश्वेश्वर यात्रेसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही यावेळी चेअरमन विक्रांत राजन पाटील यांनी सांगितले. 

सामाजिक योजनेच्या माध्यमातून यावर्षी कारखान्याच्या वतीने मातोश्री लक्ष्मीबाई पाटील शुभमंगल योजनेच्या माध्यमातून एकूण ३० सभासदांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी मुलासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये व मुलीसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.

ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी लोकनेते साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवल्यामुळेच चालू २०१७ -१८ च्या  गळीत हंगामामध्ये विक्रमी असे ७ लाख टन ऊस गाळप झाले असून, लोकनेते  कारखाना येणाऱ्या २०१८ -१९ गळीत हंगामासाठी  कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या ऊसाचे संपूर्ण नियोजन  करणार असल्याची माहिती लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील यांनी दिली. 

यावेळी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, कारखान्याचे संचालक तथा मोहोळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश चवरे,संभाजी चव्हाण, शुक्राचार्य हावळे, संदिप पवार, अशोक चव्हाण, मदन पाटील, मुख्य शेती अधिकारी एम.आय. देशमुख,वित्त व्यवस्थापक गोरख पवार, अजित बोडके, अनिल पवार, नेताजी बोडके, राजशेखर गायकवाड,संजय कूड़े, मुख्य अभियंता लक्ष्मण मुखेकर,मोहन चव्हाण, के.डी. वैद्य,बाळासाहेब पेठे,संजय गुंड, अनंत उरणे, सोमनाथ म्हेत्रे, संदिप गुंड,राहुल गुंड,गजानन गुंड,आर एम अवताड़े इत्यादीं उपस्थित होते.

Web Title: Organizing pilgrims for senior party members on behalf of Lokneta Sugar Factory