दुसऱ्याचे पैसे आपल्या खात्यावर भरल्यास चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - बेहिशेबी पैसा नातेवाइकांच्या नावावर टाकण्याची उठाठेव भविष्यात अडचणीची ठरू शकणार आहे. ज्यांच्या खात्यावर असे पैसे दिसतील, अशांना पैसा कोठून आला याची माहिती द्यावी लागणार आहे. पैसे टाकणाऱ्यांपेक्षा ज्याच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे लोक प्राप्तिकर खात्याच्या रडारवर असणार आहेत.

आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजारांच्या नोटा बाद झाल्यानंतर घरी पडून असलेला बेहिशेबी पैसा मुरवायचा कसा, असा प्रश्‍न आहे. काहींनी नातेवाइकांची खाते उघडून त्यांच्या नावावर दोन लाखापर्यंतची रक्कम टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कौटुंबिक नातेसंबंध अर्थात रक्ताचे नाते, पती-पत्नी, आई-वडील, मुली अशी नाती वगळता अन्य कुणाच्या नावावर रक्कम टाकता येणार नाहीत. कुटुंबाच्या स्तरावर रक्कम टाकताना नात्याचा उल्लेख चलनाचा मागे करावा लागणार आहे. अन्यथा ही खातीही अडचणीत येऊ शकतात.

सध्या बॅंकेत पन्नास हजारांच्या वरच्या रकमेला पॅनकार्ड सक्तीचे आहे. कुठल्या खात्यावर कुणाला उत्पनाच्या मर्यादेत रक्कम टाकता येते मात्र, त्यावरील रक्कम असेल त्याचे स्पष्टीकरण अर्थात हे पैसे आले कोठून त्याचा स्रोत सांगावा लागणार आहे. पूर्वी पाच, दहा हजार हातउसने द्या म्हंटले, की श्रीमंत मंडळींच्या भुवया उंचावायच्या. कामवाली बाई, नातेवाइकांना उसने पैसे देताना हात आखडले जायचे. नोटांबदीनंतर कामवाली बाई आणि नातेवाइक आपले वाटू लागले आहेत. बॅंकेत खाते नसेल तर मी उघडतो आणि अमूक एवढी रक्कम टाकतो, असा आग्रह धरला जात आहे. मात्र, ज्यांच्या नावावर रक्कम दिसणार आहे ते भविष्यात अडचणीत येणार आहेत. त्यामुळे रक्कम टाकून घ्यायची की नाही, याचा विचार करावा, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

Web Title: The other probe if the money in your account

टॅग्स