शाळांचे चांगले उपक्रम इतर राज्यांना देणार - अनिल स्वरूप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

कोल्हापूर  - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उत्तम असून, शाळांतील नवीन चांगल्या उपक्रमांची माहिती इतर राज्यांनाही दिली जाईल. विविध प्रदेशातील शिक्षक येथील प्रगत शाळा पाहाण्यासाठीही येतील, असे गौरवोद्‌गार केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरुप यांनी काढले. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना भेटी देऊन विविध उपक्रमांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. दोन दिवसांच्या विशेष दौऱ्यावर ते आले होते. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपाध्यक्ष शशिकांत खोत, सभापती मीनाताई पाटील, शिक्षणाधिकारी सुभाष चौगले उपस्थित होते.

श्री. स्वरुप यांनी प्रथम गडहिंग्लज तालुक्‍यातील ऐनापूर शाळेस भेट दिली. या शाळेतील ३ री ते ७ वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी संगणक हाताळतात. शाळेत वॉटर प्युरीफायर, हॅंडवॉश स्टेशन, सुसज्ज रंगमंच आदी सुविधा आहेत. येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेले इंग्रजी संभाषण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

करंबळी शाळेतील सहावीच्या वर्गातील सर्व ३४ विद्यार्थी अध्ययनासाठी टॅबचा वापर करत असल्याचे पाहून ते प्रभावीत झाले. येथील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून नाट्यीकरण सादर केले.

तालुक्‍यातील सरनोबतवाडी शाळेत त्यांनी चौथीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन घेतले. शिक्षक अध्यापनात लॅपटॉपचा वापर करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. कन्या विद्यामंदिर किणी शाळेतील विविध उपक्रम पाहिले. विद्यार्थ्यांना अवघड शब्द व जोडाक्षरयुक्त शब्द वाचण्यास सांगितले. मुलांची प्रगती पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. लेझीम पथक, वाचन कट्टा, तरंग वाचनालय, शब्दांचा डोंगर, शब्दांची अंताक्षरी आदी उपक्रम त्यांनी पाहिले.

दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला. या वेळी प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Other states give schools better activities