अन्यथा पाच वर्षे सरकार टिकणार नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांची ठाकरे सरकावर टीका

- 12 डिसेंबर पर्यंत दिली कर्जमाफीसाठी सरकारला मुदत

- अन्यथा दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

- म्हणाले, कर्जमाफी करू म्हणणारे आता अभ्यास करून निर्णय घेऊची भाषा करताहेत

पंढरपूर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेत आलेल्या महाआघाडी सरकारने तत्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी. केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे अभ्यास करतो, माहिती घेतोय असं जर करत बसले तर हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज पंढरपुरात केली. 

हे ही वाचा... राज्यावर तब्बल एवढ्या कोटींचे कर्ज

येत्या 12 डिसेंबर रोजी हुतात्मा बाबू गेनू यांचा स्मृतिदिन आहे. स्मृती दिनापर्यंत सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा सांगलीत सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही श्री. पाटील यांनी पंढरपुरात आज पत्रकारांशी बोलताना दिला. 
श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्या तडफेने मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली. त्याच तडफेने ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. सरकार येऊन आठ दिवस झाले. मंत्रिमंडळाच्या दोन बैठकाही घेतल्या. परंतु शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अद्याप घेतला नाही. पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू म्हणणारे ठाकरे आता अभ्यास करू म्हणू लागले आहेत. 

हे ही वाचा... राज्यात केवळ 56 कारखान्यांची धुराडी पेटली

विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. शेतकऱ्यांनीही या तिन्ही पक्षांच्या हाती सत्ता दिली आहे. ठाकरे सरकारने वेळकाढूपणा न करता तत्काळ कर्जमाफी देऊन आश्‍वासनाची पूर्तता करावी. या वर्षी हंगामात उसाला किमान प्रतिटन चार हजार रुपये दर मिळाला पाहिजे. गुजरात आणि उत्तर प्रदेशातील साखर कारखाने चार हजार रुपये दर देऊ शकतात, तर महाराष्ट्रातील साखर कारखाने का देऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उसाला चार हजार रुपये दर देणे शक्‍य होत नसले तर सरकारने साखर कारखाने काढण्यास परवानगी देऊन दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, अशी मागणीही श्री. पाटील यांनी केली. 

हे ही वाचा... कोल्हापूर शहरातील मटणाचा दर `ही` समिती ठरवणार

यावेळी परिषदेस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ सारवडे, सुनील बिराजदार, सुभाष चौगुले, युवराज देशमुख, रामसिद्ध होनमाने, माऊली बाबर, किसन आवताडे, महादेव बाबर उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Otherwise there is no five-year government ticket